भारतीय रेल्वेत नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच करा अर्ज

Railway Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. विशेषता ज्या तरुणांना सरकारी नोकरीची आस असेल आणि रेल्वेमध्येच नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी आजची ही बातमी म्हणजेच आनंदाची पर्वणी राहणार आहे. कारण की भारतीय मध्य रेल्वे मुंबई येथे काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात निघाली आहे.

या भरतीच्या माध्यमातून मध्य रेल्वे रिक्त पदांची भरती करणार असून यासाठी ऑफलाइन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक ती माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! ‘अस’ झालं तर यंदाच्या मान्सून काळात कमी पाऊस पडणार; मान्सून प्रभावित होण्याची शक्यता, पहा काय म्हणताय तज्ञ?

कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी होणार आहे भरती?

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मुंबई येथे जूनियर टेक्निकल असोसिएट या पदाच्या एकूण 99 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा?

या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रते संदर्भात आणि वयोमर्यादे संदर्भात सखोल अशी माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. 

अर्ज कसा करावा लागेल?

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. अर्जाचा नमुना आपणास रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होऊन जाईल.

विहित नमुन्यात अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांना आपला अर्ज मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला अंजुमन इस्लाम शाळसमोर, डी. एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई, पिनकोड- ४००००१ (उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! एसटी महामंडळात ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल दिड लाख रुपये महिना, जाहिरात पहा

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

12 मे 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज पाठवू शकणार आहेत. विहित कालावधीमध्ये आलेल्या अर्जांवरच विचार होणार आहे. कालावधी संपल्यानंतर पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद मात्र उमेदवारांनी घ्यायची आहे. 

या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या https://cr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0 या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकतात.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! वंदे भारत एक्सप्रेसनंतर मिळणार आणखी एक मोठं गिफ्ट; ‘या’ महिन्यात सुरु होणार ही खास ट्रेन, असा राहणार रूट