Railway News : पुणे आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनाकडून सुट्टीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. दिवाळीला मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. या रेल्वे गाड्या जळगाव मार्गे धावणार आहेत.

सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून पुणे – दानापूर, पुणे – गाझीपूर विशेष गाड्या सोडल्या जातील.
या गाड्या जळगाव जिल्ह्यात थांबा घेतील. जिल्ह्यातील जळगाव व भुसावळला या गाड्यांना थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातून पुण्याला जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. या विशेष गाड्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी फायद्याच्या ठरतील असा विश्वास व्यक्त केला जातोय.
पुणे – दानापूर विशेष एक्सप्रेस ट्रेन 26 सप्टेंबर पासून चालवली जाणार आहे. ही विशेष गाडी 3 डिसेंबर पर्यंत सुरू राहील. सोमवारी व शुक्रवारी ही गाडी पुणे स्थानकातून सायंकाळी सात वाजून 55 मिनिटांनी सोडली जाणार आहे. बुधवारी व रविवारी दानापुरेतून दुपारी साडेबारा वाजता ही गाडी सोडली जाणार आहे.
पुणे – गाजीपुर विशेष एक्सप्रेस ट्रेन 26 सप्टेंबर पासून चालवली जाणार आहे. या गाडीची अंतिम फेरी 29 नोव्हेंबरला असेल. शुक्रवारी व मंगळवारी पुणे येथून सकाळी पावणे सात वाजता ही गाडी सोडली जाणार आहे. शनिवारी व बुधवारी रात्री पाऊणे अकरा वाजता गाजीपुर वरून ही गाडी सोडली जाणार आहे.
याशिवाय नागपूर – हडपसर दरम्यानही विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही गाडी सुद्धा जळगाव व भुसावळला थांबणार आहे.