रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! रेल्वे कडून तिकीट दरात मोठी वाढ, कसे आहेत नवीन रेट?

Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून अखेर कार भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे प्रशासन भाडे वाढवणार असल्याच्या बातम्या फिरत होत्या आणि अखेर आता रेल्वे प्रशासनाने शुक्रवारपासून म्हणजेच आज 26 डिसेंबर 2025 पासून अधिकृतरित्या भाडेवाढ जाहीर केली आहे.

नव्या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा फटका बसणार आहे. रेल्वेच्या नव्या निर्णयानुसार 215 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अतिरिक्त भाडे द्यावे लागणार आहे.

त्याचवेळी कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढ लागू राहणार नाही. 215 किंवा त्यापेक्षा कमी अंतराच्या प्रवासासाठी तेच भाडे कायम राहणार आहे पण यापेक्षा जास्त अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिकचे भाडे द्यावे लागणार आहे.

दरम्यान आता आपण भाडेवाडीच्या या निर्णयानंतर जळगावहून नासिक मुंबईला जाण्यासाठी किती अतिरिक्त भाडे द्यावे लागणार याची माहिती या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

रेल्वेचा भाडेवाढीचा निर्णय काय सांगतो?

रेल्वेच्या नव्या निर्णयानुसार 215 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील प्रवासासाठीच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सोबतच रेल्वेने उपनगरीय गाड्या तसेच मासिक सीझन तिकीट (पास) यांच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केलेले नाही.

रेल्वेच्या नव्या निर्णयानुसार 215 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी जुनेचभाडे राहणार आहे. पण , 216 किलोमीटर पासून ते 750 किलोमीटर पर्यंतचा प्रवासासाठी अतिरिक्त पाच रुपये द्यावे लागतील.

सेच 750 ते 1250 किलोमीटरच्या अंतरासाठी अतिरिक्त दहा रुपये मोजावे लागणार आहेत. 1251 ते 1750 किलोमीटर अंतरासाठी 15 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. तसेच 1751 ते 2250 km च्या अंतरासाठी वीस रुपये अतिरिक्त भाडे द्यावे लागेल.

आता जळगाव ते नाशिक हे अंतर 216 किलोमीटर पेक्षा अधिक आहे आणि यामुळे या प्रवासासाठी प्रवाशांना अतिरिक्त पाच रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच जळगावहुन पुढे मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांना देखील तेवढीच अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे.