Railway News : येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या आधीच मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे नेटवर्क म्हणून ओळखले जाते.
रेल्वे सातत्याने आपले नेटवर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणीनुसार विविध निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान आता सेंट्रल रेल्वेने विदर्भ आणि पंचवेली एक्सप्रेसला नवीन थांबे मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

नागपूर विभागाने या दोन्ही गाड्यांना नवीन थांबे जाहीर केले आहेत आणि यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. पण नागपुर विभागाने जाहीर केलेले हे थांबे अद्याप प्रायोगिक तत्त्वावर आहेत.
प्रवाशांकडून या थांब्यांना चांगला प्रतिसाद मिळाला तर येत्या काळात हे थांबे नियमित होऊ शकतात. मुंबई – गोंदिया एक्सप्रेसला नवीन थांबा मंजूर झाला आहे. विदर्भ एक्सप्रेस आता इगतपुरी स्थानकात सुद्धा थांबणार आहे.
या गाडीला इथं थांबा मिळावा यासाठी सातत्याने मागणी उपस्थित केली जात होती. प्रवासी संघटना या मागणीसाठी रेल्वे कडे सातत्याने पाठपुरावा करत होते.
अखेर कार आता संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रशासनाने या विदर्भ एक्सप्रेसला इगतपुरी स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेतलाय.
ह्या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सेंट्रल रेल्वेचा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. सीएसएमटी येथून येणारी विदर्भ एक्सप्रेस इगतपुरीत रात्री 9:40 वाजता पोहोचेल.
गोंदियातून येणारी एक्सप्रेस इथ 3: 25 वाजता पोहोचणार आहे. त्याचवेळी नागपूर विभागाने इंदूर-नैनपूर पंचवेली एक्स्प्रेसला हिरदगड आणि जांबारा स्थानकावर नवीन थांबे दिले आहेत.