Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर अलीकडेच कोकण रेल्वे मार्गाचे पावसाळी वेळापत्रक संपलय आणि या रेल्वे मार्गावर आता नियमित वेळापत्रक सुरू झाले आहे.
नियमित वेळापत्रकामुळे रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत तसेच स्पीड मध्ये पण वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना जलद आणि सुरक्षित प्रवास करता येतोय.

दरम्यान राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कोकण रेल्वे मार्गावर नियमित वेळापत्रक लागू झाल्यानंतर आता रेल्वे कडून काही विशेष गाड्या सुद्धा सुरू केल्या जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते करमाळी दरम्यान सुद्धा विशेष गाडी सुरू करण्यात येणार आहे. ही गाडी 19 डिसेंबर पासून प्रत्यक्षात रुळावर धावणार असून याचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
ही गाडी दोन्ही दिशेने चालवली जाणार आहे. तसेच ही गाडी दररोज धावणार आहे. या गाडीची शेवटची फेरी 5 जानेवारी 2026 रोजी होईल.
दरम्यान आता आपण 19 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत चालवल्या जाणाऱ्या या स्पेशल ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
कस आहे विशेष गाडीचे वेळापत्रक?
सीएसएमटी करमाळी विशेष एक्सप्रेस ट्रेन 19 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात हे गाडी दररोज रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी करमाळी स्थानकावर पोहोचणार आहे.
करमाळी मुंबई विशेष एक्सप्रेस ट्रेन 19 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी सव्वा दोन वाजता करमाळी स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पाऊणे चार वाजता मुंबईला पोहोचणार आहे.
कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार?
मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या गाडीला एकूण 12 स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी या मार्गावरील दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या बारा स्थानकावर थांबणार आहे.