मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 17 Railway Station वर थांबा मंजूर

Updated on -

Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक खास बातमी समोर आली आहे. खरंतर, लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, नव्या वर्षाच्या निमित्ताने रेल्वे प्रशासन सुद्धा सज्ज झाले आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ख्रिसमस, नाताळ आणि नववर्ष सणाच्या काळात पर्यटन, नातेवाईक भेटी आणि सुट्टीनिमित्त फेस्टिवल स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.

खरंतर नववर्षाच्या निमित्ताने दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यंदाही अशीच स्थिती राहणार आहे आणि याचमुळे रेल्वे प्रशासनाने विशेष गाडीची घोषणा केली आहे.

प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने उत्तर महाराष्ट्र मार्गे दोन विशेष गाड्या चालवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वलसाड–बिलासपूर आणि बिलासपूर–वलसाड अशा या दोन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे.

या मार्गावरील जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर सुद्धा या गाडीला थांबा दिला जाणार आहे. या गाडीच्या एकूण आठ फेर्‍या या होणार आहेत. अशा स्थितीत आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत.

कस असणार वेळापत्रक?

ही विशेष एक्स्प्रेस वलसाड येथून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 4.50 वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री 11.40 वाजता जळगाव स्थानकात थांबा ठेवून ती बिलासपूरकडे रवाना होईल.

ही गाडी 19 डिसेंबर 2024 ते 9 जानेवारी 2025 या कालावधीत धावणार आहे. पर्यटकांची मोठी मागणी लक्षात घेत ही गाडी सणासुदीच्या काळात उपयुक्त ठरणार आहे.

तसेच ही गाडी बिलासपूर येथून प्रत्येक गुरुवारी दुपारी 4.00 वाजता रवाना होईल. शुक्रवारी सकाळी 6.58 वाजता जळगाव स्थानकात पोहोचून ती पुढे वलसाडकडे प्रयाण करेल. ही सेवा 18 डिसेंबर ते 8 जानेवारीदरम्यान उपलब्ध राहणार आहे.

कोणकोणत्या स्थानकावर थांबणार विशेष गाडी? 

ह्या दोन्ही गाड्यांना भेस्तान, चलठाण, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर आणि भाटापारा या प्रमुख स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe