Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. देशातील नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस म्हणजेच अमृत भारत एक्सप्रेस आता लवकरच महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या शहरातून दररोज धावणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, सर्वसामान्य प्रवाशांना देखील वंदे भारत एक्सप्रेस सारख्या सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाने अमृतभारत एक्सप्रेस म्हणजेच नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेली आहे.

नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सारख्याच सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, मात्र ही गाडी नॉन एसी आहे.
दरम्यान याच नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे प्रशासन आणि अमृतभारत एक्सप्रेस हे नाव दिले असून आता याच अमृतभारत एक्सप्रेस संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
खरेतर, उधना–ब्राह्मणपूर–उधना या मार्गावर अमृत भारत एक्सप्रेस चालवली जात असून ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून धावते. दरम्यान रेल्वे बोर्डाने या मार्गावरील अमृत भारत एक्सप्रेस संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या नव्या निर्णयानुसार, आता ही गाडी या मार्गावर दररोज धावणार आहे. पण, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार यासंदर्भात अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पण लवकरच याच्या अंमलबजावणीची तारीख सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे आणि या निर्णयाचा नक्कीच महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील प्रवाशांना देखील मोठा फायदा होणार आहे.
उधना–ब्राह्मणपूर–उधना अमृत भारत एक्सप्रेस सद्यस्थितीला आठवड्यातून तीन दिवस चालवली जात आहे. मात्र, या गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आता ही गाडी दररोज चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या निर्णयाचा नागपूरसह मध्य भारतातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार असून प्रवाशांच्या माध्यमातून प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उधना – ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस रविवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी धावत आहे.
तसेच ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्सप्रेस सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी धावते. परंतु रेल्वे बोर्डाने ही गाडी आता दररोज चालवण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना सर्वाधिक लाभ होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ आणि विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला आणि अमरावती या भागातील प्रवाशांना रेल्वेच्या निर्णयाचा लाभ होईल अशी आशा आहे.













