मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेडहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कस राहणार Timetable?

Railway News : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेश राज्यातील श्रीक्षेत्र प्रयागराज येथे बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील हिंदू सनातनी भाविक हजेरी लावणार आहेत.

महाराष्ट्रातीलही हजारो लोक या ठिकाणी सहभागी होणार आहेत. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रशासनाने मराठवाड्यातील नागरिकांसाठी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केलेली आहे.

रेल्वे प्रशासनाने नांदेड ते पटनादरम्यान विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. 22 डब्यांची ही विशेष एक्सप्रेस ट्रेन नांदेड ते पटना आणि पटना ते नांदेड अशी चालवली जाईल.

नांदेड ते पटना दरम्यान एक फेरी आणि पटना ते नांदेड दरम्यान एक फेरी म्हणजेच याविषयी ट्रेनच्या एकूण दोन फेऱ्या होणार आहेत. आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणत्या स्थानकावर थांबा घेऊ शकते याबाबतचा आढावा घेणार आहोत.

कस राहणार नांदेड पटना विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०७०९९ ही नांदेड ते पटणा विशेष गाडी नांदेड येथून ता. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री अकराला सुटणार आहे. नांदेड येथून रवाना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी साडेदहा वाजता पटना रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

तसेच गाडी क्रमांक ०७१०० ही पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी साडेतीनला सोडली जाणार आहे. पटना येथून रवाना झाल्यानंतर ही विशेष गाडी आलेल्या मार्गानेच नांदेड येथे ता. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ४.३० ला पोहचणार आहे.

विशेष गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते?

ही विशेष गाडी या मार्गावरील पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. नक्कीच कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी ही गाडी फायद्याची ठरणार आहे.