मार्च 2031 मध्ये Railway प्रवाशांना मिळणार मोठी गुड न्यूज ! ‘या’ मार्गांवर सुरू होणार देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे प्रवास अधिक सुपरफास्ट व्हावा यासाठी रेल्वे कडून नवनवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस हे याचेच एक उत्कृष्ट उदाहरण असून या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट झाला आहे. सध्या भारतात ज्या रेल्वेगाड्या धावतात त्या विजेवर किंवा डिझेलवर धावतात. मात्र आता भारतीय रेल्वे एक नवीन तंत्रज्ञान स्वीकारत आहे. 2031 पर्यंत देशात हायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुद्धा धावताना दिसणार आहे.

Published on -

Railway News : इंग्रजांच्या काळात सुरू झालेली रेल्वे आज भारतातील दळणवळणात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. आपल्या देशात बसने आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तर रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते. कारण म्हणजे भारतात रेल्वेचे नेटवर्क हे अगदीच कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असले तर रेल्वे सहज उपलब्ध होते.

विशेष म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा सुद्धा आहे. दरम्यानच्या काळात भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे प्रवास अधिक सुपरफास्ट व्हावा यासाठी रेल्वे कडून नवनवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या जात आहेत.

वंदे भारत एक्सप्रेस हे याचेच एक उत्कृष्ट उदाहरण असून या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा अधिक वेगवान ट्रेन देखील येत्या काही वर्षात भारतीयांच्या सेवेत दाखल होणार आहे. भारतात लवकरच बुलेट ट्रेन धावताना दिसणार असून यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार अशी आशा आहे.

अशा या परिस्थितीतच देशातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे ती म्हणजे देशात येत्या काही वर्षांनी हायड्रोजन ट्रेन सुद्धा सुरू होणार आहे. ही ट्रेन मार्च 2031 पर्यंत रुळावर धावताना दिसणार आहे. सध्या भारतात ज्या रेल्वेगाड्या धावतात त्या विजेवर किंवा डिझेलवर धावतात.

मात्र आता भारतीय रेल्वे एक नवीन तंत्रज्ञान स्वीकारत आहे. 2031 पर्यंत देशात हायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुद्धा धावताना दिसणार आहे. दरम्यान आज आपण देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गांवर धावू शकते, या प्रकल्पाची सध्याची स्थिती काय आहे ? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

मार्च 2025 मध्ये हायड्रोजन ट्रेनचा सेट तयार होणार

हायड्रोजन ट्रेन प्रोजेक्ट हा सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे सध्या देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. खरे तर, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रेल्वे मंत्रालयाने 35 हायड्रोजन फ्युअल सेल आधारित ट्रेन विकसित करण्यासाठी 2800 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

यामुळे या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून या चालू महिन्यात देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन तयार होण्याची शक्यता आहे. खरंतर हिंदुस्तानाने अलिकडेच जगातील सर्वाधिक क्षमतेचे हायड्रोजनवर चालणारे ट्रेन इंजिन विकसित केले आहे यामुळे या नव्या तंत्रज्ञानात भारताची गगन भरारी संपूर्ण जगाने पाहिली आहे.

आतापर्यंत बहुतांश देशांनी 500-600 एचपी क्षमतेच्या हायड्रोजन ट्रेन तयार केल्या आहेत, मात्र भारताने जगात पहिल्यांदाच 1200 एचपी क्षमतेचे इंजिन तयार करून या क्षेत्रात एक नवीन कीर्तीमान स्थापित केला आहे. यामुळे भारतीय रेल्वेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन या मार्गावर

मीडिया रिपोर्ट नुसार देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन येत्या सहा वर्षांनी रुळावर धावणार आहे. 2031 पर्यंत ही गाडी तयार होऊन सर्वसामान्यांसाठी सुरू केली जाऊ शकते. दरम्यान, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागातुन धावताना दिसणार आहे आणि यामुळे या विभागातील प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

या ट्रेनचा मार्ग नेमका कोणता असेल याबाबत अजून अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागामधील जिंद-सोनीपत या जवळपास 90 किलोमीटर लांबीच्या रूटवर ही गाडी सुरू होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. यामुळे ही गाडी या मार्गावरच धावणार का आणि 2031 मार्च अखेरपर्यंत ही गाडी सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe