Railway News : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आगामी काळात भारतीय रेल्वे नेटवर्क आणखी विस्तारले जाणार आहे. भारतात हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वेचे जाळे असे सोबतच हजारो रेल्वे स्थानक सुद्धा आहेत. पण भारतात पहिल्यांदाच तब्बल नऊ मजली रेल्वे स्थानकाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
खरंतर केंद्रातील सरकारकडून अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. यातील काही रेल्वे स्थानकांवर तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे.

भारतातील या शहरात तयार होणार पहिले नव मजले रेल्वे स्थानक
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या अमृतभारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून राजस्थानमधील एका रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटले जाणार आहे. राजस्थान मधील बिकानेर येथे भारतातील पहिल्या नऊ मजली रेल्वे स्थानकाची निर्मिती केली जाणार आहे.
ह्या स्थानकाची इमारत नऊ मजली उंच असेल आणि या स्थानकांची क्षमता 80 हजार प्रवासी प्रतिदिन इतकी राहणार आहे. बिकानेर हे मिठाई, नमकीन आणि ऐतिहासिक वारशासाठी जगप्रसिद्ध आहे.
या ठिकाणी जगभरातील पर्यटक पर्यटनासाठी येत असतात आणि आता याच बिकानेरमध्ये भारतातील पहिले नऊ मजली स्थानक तयार होणार आहे. हे स्थानक ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत विकसित होणार असून या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 471 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
प्रवाशांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अमृत भारत योजनेअंतर्गत बिकानेर स्थानकाचाही पुनर्विकास केला जाणार आहे. बिकानेर स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर 26 हजार चौरस मीटर आणि दुसऱ्या प्रवेशद्वारावर 17 हजार चौरस मीटर जागेवर नवीन नऊ मजली इमारती बांधल्या जात आहेत.
सध्या या प्रकल्पअंतर्गत पायाभूत सुविधा विकसित होत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे राजस्थानच्या ह्या स्थानकावर 16,000 चौरस मीटरचा रस्ता आणि सर्क्युलेटिंग एरिया असेल तसेच 15000 चौरस मीटर जागेवर पार्किंगची सुविधा राहणार आहे.
प्रवाशांना प्रवासादरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा फील मिळावा यासाठी या रेल्वे स्थानकावर 3530 चौरस मीटर जागेत 36 मीटर रुंदीचा एअर कॉन्कोर्स बांधला जात आहे, जो सर्व प्लॅटफॉर्म आणि दोन्ही टोकांवरील इमारतींना जोडणार आहे.
या ठिकाणी प्रवाशांसाठी दुकाने, कॅफेटेरिया, फूड कोर्ट, पर्यटक माहिती केंद्र आणि एक्झिक्युटिव्ह लाउंज सारख्या सुविधा असतील. म्हणजे अगदीच विमानतळावर ज्या सोयी-सुविधा प्रवाशांना मिळतात तशाच सोयी सुविधा येथे मिळणार आहेत.
या स्टेशनमध्ये 41 लिफ्ट, 24 एस्केलेटर आणि दोन नवीन फूटओव्हर ब्रिज सुद्धा विकसित केले जाणार आहेत. याशिवाय 16 हजार चौरस मीटरमध्ये प्लॅटफॉर्म शेल्टर, स्वतंत्र प्रवेश-निर्गमन दरवाजे, आधुनिक प्रतीक्षालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि इतर आवश्यक सोयीसुविधा डेव्हलप केल्या जातील.