Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारा असल्याने अनेक जण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती दाखवतात. रेल्वेच्या माध्यमातून देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान गाड्या चालवल्या जात आहेत.
जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे विभागाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतात गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात रेल्वेचे नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रेल्वे भाग देशातील जे भाग रेल्वेने जोडले गेले नाही त्या ठिकाणी नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम करत आहे.
तसेच सध्या ज्या ठिकाणी रेल्वे लाईन अस्तित्वात आहे त्या लाईनची क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे लाईनचे दुहेरीकरण आणि तिहेरीकरण देखील होत आहे.
मात्र या कामांमुळे रेल्वेला अनेकदा काही गाड्या रद्द कराव्या लागतात. दरम्यान याच कामांसाठी छत्तीसगड मधून धावणाऱ्या काही एक्सप्रेस ट्रेन गेल्या दोन दिवसांपासून रद्द करण्यात आल्या आहेत.
यामुळे जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार असून आता आपण रेल्वे विभागाने नेमक्या कोणकोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत?
बिलासपूर ते रेवादरम्यान धावणारी एक्सप्रेस 23 नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.
25, 27 आणि 29 नोव्हेंबर रोजी रेवा ते चिरमिरी पर्यंत धावणारी रेवा-चिरमिरी पॅसेंजर स्पेशल रद्द करण्यात आली आहे.
लखनौ-रायपूर दरम्यान धावणारी गरीब रथ एक्सप्रेस 29 नोव्हेंबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
दुर्ग ते निजामुद्दीन दरम्यान धावणारी एक्सप्रेस 30 नोव्हेंबर पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कानपूर ते दुर्ग दरम्यान धावणारी एक्सप्रेस 27 नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
अजमेर ते दुर्ग दरम्यान धावणारी गाडी आजच्या दिवस रद्द राहणार आहे.
चांदीया रोड ते चिरीमरी दरम्यान धावणारी गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
इंदूर-बिलासपुर नर्मदा एक्सप्रेस 23 नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत रद्द करण्याचा मोठा निर्णय रेल्वे भागाने घेतला आहे.
बिलासपूर भोपाळ एक्सप्रेस 23 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर पर्यंत रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.
जबलपूर ते अंबिकापुरदरम्यान धावणारी एक्सप्रेस 23 नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.