‘हे’ भारतातील असे एकमेव रेल्वेस्थानक आहे जेथून तुम्ही देशातील कोणत्याही शहरासाठी ट्रेन पकडू शकतात ! इथं दररोज 197 रेल्वे गाड्या थांबतात

भारतात बहुसंख्य जनता ही रेल्वेने प्रवास करते. प्रवास लांबचा असो किंवा जवळचा रेल्वेने प्रवास करायला पसंती दाखवली जाते. कारण म्हणजे खिशाला परवडणारा प्रवास आणि दुसरे म्हणजे तुम्हाला हवे तिथे तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहिले आहे आणि भविष्यातही रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी असेच तत्पर राहील.

Tejas B Shelar
Published:
Railway News

Railway News : भारत हे जलद गतीने विकसित होत असलेले राष्ट्र म्हणून ओळखले जात आहे. भारत हे जगाच्या नकाशावर सर्वाधिक लोकसंख्या असणारे राष्ट्र. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत देशाने जी प्रगती केली आहे त्या प्रगतीच्या मागे विविध फॅक्टर कारणीभूत आहेत.

मात्र देशाच्या या विकासात कुठे ना कुठे कनेक्टिव्हिटी चे महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. कनेक्टिव्हिटी चा विषय आला की रेल्वेचा विषय निघतोच. भारतात बहुसंख्य जनता ही रेल्वेने प्रवास करते. प्रवास लांबचा असो किंवा जवळचा रेल्वेने प्रवास करायला पसंती दाखवली जाते.

कारण म्हणजे खिशाला परवडणारा प्रवास आणि दुसरे म्हणजे तुम्हाला हवे तिथे तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहिले आहे आणि भविष्यातही रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी असेच तत्पर राहील.

भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वाधिक लांबीच्या रेल्वे नेटवर्क असणाऱ्या देशांच्या यादीत आहे. भारतात अनेक मोठ मोठे रेल्वे स्थानक आहेत. तर आज आपण अशा एका रेल्वेस्थानकाची माहिती जाणून घेणार आहोत जिथे तब्बल 197 रेल्वे गाड्या दररोज थांबत आहेत.

हे देशातील असे एकमेव स्थानक आहे जेथून देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तरी देखील तुम्हाला गाडी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात देशातील या स्थानकाची माहिती.

हे आहे देशातील अनोखे रेल्वे स्टेशनं

मथुरा जंक्शन हे भारतातील एकमेव रेल्वे स्टेशनचे नाव आहे जिथून चारही दिशांना जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. म्हणजेच तुम्ही या जंक्शन वर गेलात आणि तुम्हाला देशातील कोणत्याही भागात जायचे असेल तर तुम्हाला येथून गाडी मिळून जाणार आहे.

हे स्थानक उत्तर मध्य रेल्वे झोनमध्ये येते, जे देशातील सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शनांपैकी एक आहे. येथे तुम्हाला प्रत्येक मार्गासाठी 24 तास ट्रेन मिळेल. मथुरा जंक्शनवर एकूण 10 प्लॅटफॉर्म आहेत. मथुरा जंक्शनवर एकूण 197 गाड्यांना थांबे देण्यात आलेले आहेत.

ज्यामध्ये राजधानी, शताब्दी, दुरांतो, सुपरफास्ट, एक्सप्रेस, मेल आणि मेमो आणि डेमो गाड्यांचा समावेश आहे, तर अपना सराफ येथून 13 ट्रेन वेगवेगळ्या दिशांसाठी सुरू होतात. 1875 मध्ये प्रथमच मथुरा जंक्शन येथून गाड्या सुरू झाल्या, जे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.

हे भगवान श्रीकृष्णाचे शहर देखील मानले जाते. होळी आणि जन्माष्टमीच्या वेळी येथे मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेकडून मथुरा जंक्शनमार्गे विशेष गाड्याही चालवल्या जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe