वंदे भारत स्लीपर ट्रेन ‘या’ तारखेला सुरू होणार ! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी माहिती

Published on -

Railway News : देशाला लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगात चौथ्या स्थानी येते. प्रवाशांसाठी रेल्वे कडून राजधानी शताब्दी अशा एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत.

या सोबतच गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस देखील प्रवाशांना सेवा देत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी सुरू झालेली ही गाडी देशातील पहिली भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे.

ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. ही सेमी हायस्पीड ट्रेन महाराष्ट्रातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर धावत आहे.

अशातच आता वंदे भारत एक्सप्रेसच्या अबूतपूर्व यशानंतर या ट्रेनचे स्लीपर व्हर्जन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची बातमी समोर येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या गाडीचे स्लीपर वर्जन कधीपर्यंत लॉन्च होणार या संदर्भात नुकतीच महत्त्वाची माहिती दिली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले की, वंदे भारत स्लीपर गाड्या दुसरी गाडी नियमित सेवेसाठी तयार झाल्यानंतरच सुरू करण्यात येतील.

दिल्लीतील शकूर बस्ती कोचिंग डेपो येथे एक गाडीची सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या असून ती लाँचसाठी सज्ज आहे, अशी माहिती पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली.

वैष्णव म्हणाले की दुसरी गाडी उत्पादनाधीन असून ती 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यांनी दोन्ही गाड्या एकत्र सुरू केल्या जातील असे माध्यमांना सांगितले आहे.

यावरून 15 ऑक्टोबर नंतर वंदे भारत स्लीपर प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की दुसरी गाडी ही नियमित सेवांच्या सातत्यासाठी महत्त्वाची आहे.

म्हणूनच आम्ही दुसऱ्या रेकची प्रतीक्षा करत आहोत. ती मिळाल्यानंतर कोणत्याही मार्गावर निर्णय घेऊन गाड्या सुरू करू, असे वैष्णव यांनी नमूद केले.

दरम्यान, या गाड्या दिल्ली–पाटणा या मार्गावर सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे या घोषणेचे राजकीय महत्त्वही वाढले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News