महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट ! ‘या’ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा अलर्ट, वाचा…

Rain Alert : यावर्षी 21 ऑक्टोबर पासून दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे. दिवाळीमुळे सगळीकडेच अगदीच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. पण गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वित्त व जीवितहानीमुळे सर्वसामान्य  नागरिक अडचणीत आले आहेत आणि सरकारकडे ओल्या दुष्काळाची मागणी होत आहे. दरम्यान सप्टेंबर सारखीच परिस्थिती आता ऑक्टोबर मध्ये सुद्धा तयार होणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

कारण की पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. यातील सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. आता ह्या बातमीने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय.

खरे तर आता सोयाबीन सारखे गरीब हंगामातील महत्त्वाचे पिके अंतिम टप्प्यात आहेत. काही ठिकाणी सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू आहे. विजयादशमीपासून सोयाबीन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. कापसाचा हंगाम सुद्धा आता सुरू झालाय. अर्थात खरीपातील महत्त्वाची पिके काढणीच्या अवस्थेत आहेत.

डाळिंब बागांची पण हार्वेस्टिंग सुरू आहे. अशा या परिस्थितीत जर पावसाच्या आगमन झाले तर सहाजिकच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत.

खरेतर, हवामान खात्याने राज्यातील कोकण पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणाराचा अंदाज दिला आहे. आता आपण कोणत्या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे? याची माहिती जाणून घेणार आहोत. 

या जिल्ह्यात मध्यम पाऊस पडणार (येलो अलर्ट)

रायगड 

रत्नागिरी 

सिंधुदुर्ग 

कोल्हापूर

सांगली

सोलापूर

पुणे

इथं हलका पाऊस पडणार ( नो अलर्ट) 

जालना

परभणी

बीड

हिंगोली

नांदेड

लातूर 

धाराशिव

संभाजीनगर

धुळे

नंदुरबार

जळगाव

नाशिक 

अहिल्यानगर

मुंबई 

ठाणे 

सातारा 

इथं हवामान कोरडं असेल

अमरावती 

भंडारा

बुलढाणा

चंद्रपूर

गडचिरोली

गोंदिया

नागपूर

वर्धा

वाशिम 

यवतमाळ