5 आणि 6 जानेवारीला देशातील ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता ! आता स्वेटर नाही रेनकोट घाला

फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यात काळी पाऊस पाहायला मिळाला. दरम्यान आता नवीन वर्षाची सुरुवातही अशीच काहीशी होणार असे दिसते. देशातील काही राज्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.

Tejas B Shelar
Published:
Rain Alert

Rain Alert : गेल्या महिन्यात अर्थातच डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत होते. डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यातील थंडीचे प्रमाण वाढले आणि त्यानंतर महाराष्ट्रात थंडी दूर झाली आणि पावसाला सुरुवात झाली. डिसेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यात काळी पाऊस पाहायला मिळाला. दरम्यान आता नवीन वर्षाची सुरुवातही अशीच काहीशी होणार असे दिसते. देशातील काही राज्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.

भारतीय हवामान खात्याने पाच आणि सहा जानेवारीला देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी सात जानेवारीपर्यंत बर्फवृष्टीचा अन पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, पाच आणि सहा जानेवारीला देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच डोंगराळ भागांमध्ये 7 जानेवारी पर्यंत बर्फ वृष्टी होईल आणि काही ठिकाणी पाऊस पडू शकतो असे आयएमडीच्या तज्ञांनी सांगितले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ४-५ जानेवारीला हिमवर्षावासह पाऊस होणार असा अंदाज असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऐन हिवाळ्यात देशातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.

हवामानातील बदलांमुळे पाच आणि सहा जानेवारीला पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये हे दोन दिवस जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ४-५ जानेवारीला (म्हणजेच आज आणि उद्या) बर्फवृष्टी आणि पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

पण देशातील काही राज्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होण्याचे नेमके कारण काय? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का. आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभ या स्थितीमुळे वातावरणात बदल घडला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

पश्चिमेकडून भारताकडे येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे वातावरणात बदल घडतो, या स्थितीला पश्चिमी विक्षोभ असे म्हटले जाते. यामुळेच जानेवारीच्या सुरुवातीला देशभरात काही ठिकाणी पर्जन्यवृष्टी, काही ठिकाणी हिमवर्षाव, तर काही ठिकाणी धुके पडले आहे, असं तज्ञांचे म्हणणं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe