Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे ते म्हणजे एक जानेवारी 2026 पासून धान्य वाटपात महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. यामुळे तुम्हीही रेशन कार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुरवठा विभागाने अलीकडेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या दोन्ही योजनांतील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक नियतन प्रमाणात महत्त्वपूर्ण बदल केले होते.

या बदलानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 25 किलो तांदूळ आणि दहा किलो गहू दिले जाऊ लागले. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रति सदस्य चार किलो तांदूळ आणि एक किलो गहू या पद्धतीने धान्य वाटप सुरू झाले.
गव्हाचा स्टॉक कमी असल्याने कदाचित शासनाने हा निर्णय घेतला असावा. मात्र आता पुन्हा एकदा पुरवठा विभागाने गव्हाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एक जानेवारी 2026 पासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
म्हणजे डिसेंबर महिन्यात जे धान्य वाटप होईल यात अंत्योदय रेशन कार्डधारकांना 25 किलो तांदूळ आणि दहा किलो गहू मिळणार आहे. त्याचवेळी प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य चार किलो तांदूळ आणि एक किलो गहू या पद्धतीने धान्याचे वाटप केले जाणार आहे.
मात्र जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रतिष्ठा पत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू या प्रमाणात धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सदस्य 3 kg तांदूळ आणि दोन किलो गहू या पद्धतीने धान्य वाटप करण्यात येणार आहे.
म्हणजे आधी जे प्रमाण होतं तेच प्रमाण आता जानेवारी महिन्यापासून लागू होईल. अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. आता नव्या वर्षापासून पूर्वीचे जुने नियतन प्रमाण पुन्हा लागू करण्यात येणार आहे.
तांदळाचे प्रमाण वाढवून गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे केंद्र व राज्य पातळीवर पुरवठा सुलभ करणे हा होता. मात्र, आता अन्नधान्य साठा व्यवस्थापन आणि वितरणातील समतोल राखण्यासाठी जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा आधीचे प्रमाण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार, अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना प्रती शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू दिला जाणार आहे. तसेच, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रति सदस्य 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू असे धान्य वाटप केले जाणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की डिसेंबर 2025 या महिन्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डिसेंबर महिन्यात सध्या लागू असलेल्या प्रमाणाानुसारच धान्याचे वाटप केले जाणार आहे.
या निर्णयामुळे जानेवारी 2026 पासून लाखो शिधापत्रिकाधारकांच्या धान्य नियतनात बदल होणार असून, लाभार्थ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.













