अर्ज केल्यानंतर रेशन कार्डवर नवीन सदस्यांचे नाव किती दिवसांनी ऍड केले जाते ? वाचा सविस्तर….

Tejas B Shelar
Published:
Ration Card News

Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. खरंतर रेशन कार्डधारकांना शासनाच्या माध्यमातून रास्त भावात रेशन उपलब्ध करून दिले जाते. रेशन कार्ड मुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला रास्तभावात गहू, तांदूळ उपलब्ध होत आहे. एवढेच नाही तर काही विशिष्ट रेशन कार्ड धारकांना साखर देखील रास्त भावात उपलब्ध करून दिली जाते.

अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्यांना रास्त भावात साखर मिळते. महत्वाचे म्हणजे रेशन कार्ड फक्त राशन भरण्यासाठीच उपयोगी येते, यामुळे फक्त रास्त भावात रेशनच मिळते असे नाही तर हे एक महत्त्वाचे शासकीय डॉक्युमेंट देखील आहे.

याचा विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि विविध शासकीय तथा निमशासकीय कामांमध्ये वापर होतो. रेशन कार्ड अर्थातच शिधापत्रिका ही कुटुंबप्रमुखाच्या नावाने जारी केली जाते. शिवाय यामध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे देखील असतात.

जेव्हा केव्हा कुटुंबात एखाद्या नवीन सदस्याच्या आगमन होते म्हणजेच नवीन बाळ जन्माला येते तेव्हा रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ॲड केले जाते. तसेच घरातील पुरुष सदस्याचे लग्न झाल्यास कुटुंबात येणाऱ्या नववधूचे देखील नाव रेशन कार्ड मध्ये ऍड केले जाते.

परंतु रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ॲड करण्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसांनी प्रत्यक्षात रेशन कार्ड मध्ये सदर नवीन सदस्याचे नाव ॲड होते याच संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत. तसेच रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी कोणता अर्ज भरावा लागतो याविषयी देखील आज आपण माहिती पाहणार आहोत.

नवीन सदस्याचे नाव कसे ऍड करणार?

रेशन कार्ड मध्ये जर नवीन सदस्याचे नाव जोडायचे असेल तर यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता. शिधापत्रिकेमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला फॉर्म 3 भरावा लागणार आहे. अन्न विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही हा अर्ज डाऊनलोड करू शकता.

यासाठीचा आवश्यक अर्ज डाऊनलोड केल्यानंतर आणि फॉर्म योग्यरीत्या भरल्यानंतर तुम्ही आवश्यक कागदपत्रांसहित हा अर्ज थेट अन्न विभागाच्या वेबसाईटवर जाऊन अपलोड करता येतो.

याशिवाय नागरिकांना त्यांच्या जवळील सीएससी केंद्रावर जाऊन देखील हा फॉर्म अपलोड करता येऊ शकतो. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडण्यासाठी काही कागदपत्रे द्यावे लागतात.

जर समजा कुटुंबात नवीन बालकाचा जन्म झाला असेल तर त्या बालकाचा जन्म दाखला आणि तसेच जर नववधूचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडायचे असेल तर विवाहाचा दाखला द्यावा लागतो. एवढेच नाही तर नववधूच्या माहेरकडील रेशन कार्डवरील नाव कमी केल्या बाबतचा दाखलाही द्यावा लागतो.

यासोबतच आधार कार्ड, प्रतिज्ञापत्र आणि पासपोर्ट साईज फोटो देखील द्यावे लागतात. अर्ज सादर झाल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर रेशन कार्ड वर नवीन सदस्याचे नाव ॲड होते. या प्रक्रियेसाठी साधारणतः 15 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe