Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर शिधापत्रिका धारकांसाठी आता ई-केवायसीची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या लोकांचे शिधापत्रिकेत नाव आहे त्या सर्वांनी आधार कार्डच्या साह्याने ई-केवायसी ची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. जे लोक ही प्रक्रिया करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल आणि अशा लोकांना स्वस्त अन्नधान्याचा लाभ मिळणार नाही.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून ई-केवायसी न केलेल्या रेशन कार्ड धारक लोकांचे नाव रद्द केले जाणार आहे. अशा परिस्थितीत ई-केवायसीची प्रक्रिया ज्या लोकांनी अजून केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान आज आपण घरबसल्या रेशन कार्डची केवायसी झाली आहे की नाही हे कसे चेक करायच अन ही प्रक्रिया कशी करायची? या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
घरबसल्या कसं चेक करणार ई-केवायसीचे स्टेटस ?
आता घरबसल्या रेशन कार्ड ची ई-केवायसी झाली आहे की नाही हे चेक करता येणार आहे यासाठी शासनाने अधिकृत एप्लीकेशनवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मेरा राशन या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केवायसी झाली आहे की नाही हे चेक करता येणे शक्य आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard या लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन ओपन करायचे आहे.
एप्लीकेशन ओपन झाले की तिथे तुम्हाला रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्याचा पर्याय दिसेल. आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करा. त्यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर यावे.
त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा ऑप्शन दिसेल. ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही.
आणि ज्या सदस्याच्या नावापढे नो असा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करावी लागेल. ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. जिथे तुम्ही रेशन घेतात त्या रेशन दुकानातच तुम्हाला केवायसी करून मिळणार आहे.
या रेशन दुकानदारांकडे फोर-जी ईपॉस मशीन आहेत, या मशीनद्वारे ई केवायसी केली जाते. यासाठी आधार कार्ड घेऊन जावे लागणार आहे. या ठिकाणी या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो. यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.