मोठी बातमी ! आता रेशन कार्ड धारकांना 30 एप्रिल 2025 पर्यंत ‘ही’ कागदपत्रे द्यावी लागणार, नाहीतर Ration Card रद्द होणार

रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील काही रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. यामुळे अनेकांचे टेन्शन वाढले आहे.

Published on -

Ration Card News : राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेशन कार्ड धारकांना आता अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. जे कार्ड धारक ही कागदपत्रे सादर करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.

यामुळे सध्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून रेशन कार्डधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यभरात एक मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील रेशन कार्ड धारकांची तपासणी केली जाणार आहे. खरे तर अनेकजण मोफत रेशनसाठी अपात्र असतांनाही चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड बनवून धान्याचा लाभ घेत आहेत. तसेच, राज्यात अनेक प्रकरणांमध्ये एकाच पत्त्यावर एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असणे, मयत व्यक्तींची नावे रेशन कार्ड वर तशीच कायम असणे तसेच विदेशी नागरिकांकडे रेशनकार्ड असल्याचे प्रकरण समोर आले आहेत.

दरम्यान, अशाच अपात्र लोकांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने राज्यातील केशरी व पांढऱ्या रेशनकार्डधारकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या तपासणी मोहिमेअंतर्गत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त असेल आणि त्यांच्याकडे केशरी रेशनकार्ड असेल तर अशांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. या संबंधित जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांचे केशरी रेशन कार्ड रद्द होईल आणि त्यांना नवीन पांढरे रेशन कार्ड जारी केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाकडून हाती घेण्यात आलेल्या मोहीमेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हजारो लोकांची रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान या मोहिमेअंतर्गत रेशन कार्डधारकांना एक अर्ज करावा लागणार आहे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा सादर करावी लागणार आहेत जेणेकरून त्यांची पडताळणी पूर्ण होईल.

हा अर्ज रेशन दुकानांमध्ये उपलब्ध असून लवकरात लवकर शिधापत्रिकाधारकांनी हा अर्ज भरून अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा व जुनी कागदपत्रे जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा अर्ज 30 एप्रिल 2025 पर्यंत रेशन दुकानदारांकडे जमा करायचा आहे.

जर रेशन कार्ड धारकांनी अपूर्ण कागदपत्रे जमा केलीत किंवा अर्ज भरला नाही तर अशा लोकांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल पर्यंत दिलेल्या अर्जात ज्या रेशनकार्ड धारकांची कागदपत्रे अपूर्ण असतील; त्यांना 31 मे 2025 पर्यंत कागदपत्रे जमा करता येणार आहेत.

जर या वाढीव वेळेतही संबंधितांनी कागदपत्रे जमा केली नाही तर मग त्यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. स्वतः राज्य शासनाच्या नागरी व पुरवठा विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे लवकरात लवकर रेशन कार्ड धारकांनी रेशन दुकानात जाऊन हा अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News