आनंदाची बातमी! आता रेशन दुकानातील धान्याचा काळाबाजार कायमचा बंद होणार, दुकानात धान्य आल्याबरोबर रेशन कार्ड धारकांना मॅसेज मिळणार

या नव्या प्रणालीमुळे आता रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानात धान्य पोहोचले की लगेचच मेसेज जाणार आणि त्यांनी धान्य भरल्यानंतरही एक मेसेज पोहचणार आहे. रेशन दुकानांवर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या मोबाइलवर येणार आहे.

Ration Card News

Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यभरातील अनेक रेशन दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. दरम्यान सर्वसामान्य गरजवंत नागरिकांसाठी उपलब्ध होणाऱ्या याच धान्याची काळाबाजार ही रोखण्यासाठी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ठोस उपाययोजना केल्या जात आहेत.

यासाठी एसएमएस गेटवे हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे आता रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानात धान्य पोहोचले की लगेचच मेसेज जाणार आणि त्यांनी धान्य भरल्यानंतरही एक मेसेज पोहचणार आहे.

रेशन दुकानांवर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या मोबाइलवर येणार आहे. यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या काळाबाजारावर मोठ्या प्रमाणात अंकुश लागणार असा विश्वास सरकारकडून व्यक्त होतोय.

मात्र यासाठी रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानात जावे लागणार आहे. रेशन दुकानात जाऊन रेशन कार्ड मध्ये जेवढी नावे आहेत त्या सर्व सदस्यांची आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.

यासोबतच रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, कोणत्या गोदामातून रेशन दुकानात किती धान्य पाठविले, तसेच दुकानातून किती आणि कधी धान्य उचलले, याची माहिती रेशनकार्ड धारकांच्या मोबाइलवर एसएमएसने देण्यात येणार आहे.

नक्कीच या सर्व प्रक्रियेमुळे रेशन वितरणाची ही सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शक होणार आहे. जो ओरिजनल लाभार्थी आहे त्यालाच या रेशनिंग चा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाच्या या पावलाचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

रेशन कार्ड धारकांनी देखील पुरवठा विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून लवकरात लवकर ही सुविधा पूर्णपणे कार्यान्वित झाली पाहिजे अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यासाठी मात्र नागरिकांना देखील पुरवठा विभागाला सहकार्य करावे लागणार आहे.

रेशन कार्ड धारकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नियमित वापरात असलेला मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी जोडून घेणे आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे मोबाईल क्रमांक रेशन कार्ड सोबत जोडण्याची प्रक्रिया फारच सोपी असून यासाठी धान्य मिळणाऱ्या रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe