बातमी कामाची ! आता ‘या’ नागरिकांना रेशन कार्ड बनवता येणार नाही, Ration Card चे नियम काय सांगतात ?

Tejas B Shelar
Published:
Ration Card News

Ration Card News : तुम्हीही नवीन रेशन कार्ड बनवण्याच्या तयारीत आहात का ? मग नव्याने शिधापत्रिका मिळवण्यासाठी अर्ज करण्याआधी आजची ही बातमी पूर्ण वाचा. खरे तर शासनाच्या माध्यमातून देशभरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत सर्वसामान्य गोरगरीब जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य पुरवले जात आहे.

मात्र शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या स्वस्त दरातील अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका असणे आवश्यक असते. एका कुटुंबाला एक शिधापत्रिका मिळत असते. या शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे समाविष्ट असतात.

रेशन कार्ड मध्ये असणाऱ्या कुटुंबाच्या सदस्य संख्येवरून शासनाकडून नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात असते. कोरोना काळापासून मात्र रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे. रेशन कार्डचा उपयोग फक्त मोफत रेशन घेण्यासाठीच होतो असा नाही तर याचा वापर शासकीय कामांसाठी देखील केला जातो.

शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तरीदेखील रेशन कार्ड आवश्यक असते. सध्या महाराष्ट्रात ज्या योजनेची चर्चा आहे त्या लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी देखील रेशन कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डसाठी नागरिकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

काही राज्यांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. तर काही ठिकाणी फक्त ऑफलाईन आणि काही ठिकाणी फक्त ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. मात्र, रेशन कार्ड संदर्भात केंद्रातील सरकारने काही नियम तयार केले आहेत. या नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांनाच रेशन कार्डचा लाभ दिला जात असतो. पण जें लोक या नियमांचे पालन करत नाहीत त्यांना रेशन कार्ड बनवता येत नाही.

रेशन कार्डसाठी कोणते नागरिक ठरणार अपात्र?

100 चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन, प्लॉट, फ्लॅट आणि घर असणारे नागरिक यासाठी अपात्र ठरतात.

चारचाकी वाहन, जसे की कार, ट्रॅक्टर असणारे नागरिक देखील रेशन कार्ड साठी अपात्र ठरतात.

आयकर भरणारे लोक रेशन कार्ड साठी अर्ज करू शकत नाहीत.

ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे असे लोकही रेशन कार्ड साठी अर्ज करू शकत नाहीत.

घरात फ्रीज आणि एसी असणारे नागरिक देखील रेशन कार्ड साठी अर्ज करू शकत नाहीत.

एखाद्या कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीत असेल तर अशा कुटुंबाला रेशन कार्ड बनवता येत नाही.

ग्रामीण भागात दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आणि शहरी भागात तीन लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणारे कुटुंब रेशन कार्ड साठी अपात्र ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe