रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ एप्लीकेशनमधून घरबसल्या नवीन सदस्याचे नाव जोडता येणार

तुमच्या रेशन कार्ड मध्ये तुम्हाला तुमच्या घरातील नव्या सदस्याचे नाव ऍड करायचे असेल तर आता तुम्ही अवघ्या दोन मिनिटात नवीन सदस्याचे नाव तुमच्या रेशन कार्ड मध्ये जोडू शकता. यासाठी सरकारने एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे.

Published on -

Ration Card News : सरकारकडून रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात रेशनवरील धान्याचा लाभ दिला जातो. रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे जोडली जातात. मात्र, घरात नव्या सदस्याच्या आगमन झाले, म्हणजे जर घरात नववधू आली किंवा नवीन बाळाचा जन्म झाला तर त्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडताना सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील केली जात असते. शिवाय सर्वसामान्य नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाया जातो. पण आता सरकारने ही प्रोसेस फार सोपी केली आहे. कारण की आता घरबसल्या रेशन कार्ड मध्ये नव्या सदस्याचे नाव जोडता येणार आहे.

घरबसल्या नव्या सदस्याचे नाव कसे जोडणार?

जर तुम्हालाही तुमच्या रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जुळवायचे असेल तर यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एप्लीकेशन डाउनलोड करून ऑनलाईन अर्ज करू शकता.

नव्या सदस्याचे नाव जोडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन सरकारकडून सुरू करण्यात आलेले रेशन कार्ड किंवा मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.

एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये लॉगिन घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्ड च्या मदतीने या ॲप्लिकेशन मध्ये लॉगिन घेऊ शकता. लॉगिन करताना तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला टाकावा लागणार आहे.

तुम्ही एप्लीकेशन मध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची डिटेल पाहायला मिळेल. तसेच या ठिकाणी तुम्हाला फॅमिली डिटेल्स मॅनेज करण्याचा एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला ऍड न्यू मेंबर म्हणजेच नवीन सदस्य जोडा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागणार आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या नव्या सदस्याची सर्व माहिती दिलेल्या रकान्यात भरावी लागणार आहे. नवीन सदस्याची माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करावा लागणार आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या घरातील नव्या सदस्याचे नाव तुमच्या रेशन कार्डवर लागेल.

दुसरीकडे रेशन कार्ड धारकांना केवायसी ची प्रक्रिया देखील पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे रेशन कार्ड धारक केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना रेशनवरील धान्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!