Ration Card News : देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेशन कार्ड हा भारतीय नागरिकांचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका धारकांना शासनाच्या माध्यमातून रास्त भावात अन्नधान्य सुद्धा उपलब्ध करून दिले जाते.
रेशन कार्डचा उपयोग फक्त स्वस्तात धान्य मिळवण्यासाठी होत नाही तर याव्यतिरिक्तही याचे अनेक फायदे आहेत. शासकीय धान्य वितरण, विविध योजनांचा लाभ, ओळखपत्र म्हणून रेशन कार्डचा सर्वच ठिकाणी वापर होतो. दरम्यान आज आम्ही रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

खरे तर तुमच्याकडे पण कागदी रेशन कार्ड असेल. मात्र, रेशन कार्डचा वर्षानुवर्ष वापर होतो अन म्हणून कागदी शिधापत्रिका कालांतराने फाटणे, पुसट होणे किंवा हरवणे अशा अडचणी येतात. रेशन कार्ड फाटल्यामुळे सर्वसामान्यांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
पावसाळ्यात ओलाव्यामुळे किंवा सततच्या हाताळणीमुळे कागदी रेशनकार्ड खराब होण्याचे प्रकार सर्रास घडततात. साहजिकच रेशन कार्ड फाटल्यानंतर नागरिकांना रेशन दुकानात किंवा शासकीय कार्यालयात अडचणींचा सामना करावा लागत होता.
पण आता याचं सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिले आहे. आता नागरिकांना डिजिटल रेशन कार्ड उपलब्ध झाले आहे. यामुळे कागदी रेशन कार्ड वापरण्याची आता नागरिकांना गरज उरलेली नाही. यासाठी ‘मेरारेशन’ हे अधिकृत मोबाईल अॅप सुरू केले असून, यामुळे नागरिकांना डिजिटल रेशनकार्डची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या अॅपच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना आपले संपूर्ण रेशनकार्ड मोबाईलवर पाहता येते तसेच ते डाउनलोडही करता येते. विशेष म्हणजे, या डिजिटल रेशनकार्डचा वापर करून PVC म्हणजेच प्लास्टिक रेशनकार्ड तयार करण्याची सोय नागरिकांना मिळत आहे. ‘मेरारेशन’ अॅप वापरण्यासाठी सर्वप्रथम ते स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे लागते.
अॅप उघडल्यानंतर लाभार्थी पर्याय निवडून रेशनकार्डशी लिंक असलेला आधार क्रमांक टाकावा लागतो. कॅप्चा भरल्यानंतर ओटीपीद्वारे लॉग-इन प्रक्रिया पूर्ण होते. लॉग-इन झाल्यावर अॅपच्या मुख्य पानावरच ई-रेशनकार्ड दिसते. यात कुटुंबप्रमुखाचे नाव, रेशनकार्ड क्रमांक आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती उपलब्ध असते.
या ई-रेशनकार्डची पीडीएफ प्रत मोबाईल किंवा संगणकात डाउनलोड करता येते. ही पीडीएफ प्रत शासकीय कामांसाठी ग्राह्य धरली जाते. डाउनलोड केलेल्या पीडीएफच्या आधारे नागरिक त्यांच्या परिसरातील PVC कार्ड प्रिंटिंग केंद्रावर जाऊन प्लास्टिक रेशनकार्ड तयार करू शकतात.
एटीएम कार्डप्रमाणे मजबूत, टिकाऊ आणि जलरोधक असल्यामुळे PVC रेशनकार्ड अधिक सोयीचे ठरत आहे. डिजिटल आणि PVC रेशनकार्डमुळे कागदी कार्ड सांभाळण्याची चिंता दूर होते.