रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! आता रेशन दुकानात किती धान्य मिळणार हे मॅसेजद्वारे आधीच समजणार

Published on -

Ration Card News : राज्यभरातील रेशन कार्डधारकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातुन प्रत्येक महिन्याला रास्त भावात धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान आता रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानात जाण्याआधीच किती धान्य मिळणार हे समजणार आहे.

यासाठी पुरवठा विभागाकडून एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आले असून या प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना किती आणि कोणते धान्य मिळणार हे रेशन दुकानात जाण्याआधीच एसएमएसद्वारे समजून जाणार आहे.

म्हणजे महिन्याकाठी मिळणाऱ्या धान्याचा अचूक हिशेब आता नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर थेट एसएमएसद्वारे उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशाने पुरवठा विभागाने ही महत्त्वाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ही प्रणाली अलीकडेच सुरू केली असून नोव्हेंबरमधील धान्य वाटपासंदर्भात अनेक लाभार्थ्यांना अशा संदेशांची पाठवणी करण्यात आली आहे. या एसएमएसमध्ये लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याचा तपशीलवार कोटा नमूद करण्यात आला आहे.

ज्वारी, गहू आणि तांदूळ यापैकी प्रत्येक धान्याचा किती किलो वाटा देण्यात आला आहे याची माहिती स्पष्टपणे देण्यात येते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत हे धान्य पूर्णपणे निशुल्क असल्याचेही संदेशात नमूद आहे.

धान्य घेतल्यानंतर पावती घेणे बंधनकारक असल्याबाबतही एसएमएसद्वारे सूचित करण्यात आले आहे. वितरण प्रक्रियेत अनियमितता आणि गैरप्रकारांना आळा बसावा, याकरिता तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२४९५० आणि १९६७ उपलब्ध आहेत.

काही कारणास्तव एसएमएस न मिळाल्यास कार्डधारक ‘मेरा रेशन’ अ‍ॅपवर आधार क्रमांक वापरून धान्याचा कोटा तपासू शकतात. मंजूर धान्य आणि प्रत्यक्ष मिळालेल्या वाट्यातील फरक ओळखण्यास हे अ‍ॅप उपयुक्त ठरत आहे.

पण रेशन कार्डशी मोबाइल क्रमांक जोडल्यासच एसएमएस सेवा मिळणार आहे. या नव्या सुविधेच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना पुढील महिन्यात कोणते आणि किती धान्य मिळणार आहे याची माहिती नियमित मिळेल.

पण या प्रणालीमध्ये काही त्रुटी सुद्धा आढळून आल्या आहेत. यामुळे सध्या प्रणाली सुधारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ही प्रणाली अपडेट केली जाणार आहे. काही ग्राहकांना चुकीचे संदेश येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या असून पुरवठा विभागाने याचा तपास सुरू केला आहे.

पुरवठा विभागाने या नव्या प्रणालीमुळे पारदर्शकता वाढणार असा विश्वास व्यक्त केला आहे. आधीच ग्राहकांना किती आणि कोणते धान्य उपलब्ध होणार याची माहिती गेल्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल असे सुद्धा पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रणालीचे अपडेशन सुरू असल्याने काही ठिकाणी चुकीचे संदेश मिळत आहेत. पण चुकीचा मेसेज आल्यास पुरवठा विभाग किंवा दुकानदारांशी संपर्क साधावा, असे आव्हान ऑल महाराष्ट्रा फेअरप्राईज शॉपकीपर्स फेडरेशन यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News