Ration Card News : देशातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. खरंतर शासनाकडून गरजू लोकांनां मोफत रेशन मिळत आहे. कोरोना काळापासून रेशन कार्डधारकांना मोफत रेशन वितरित केले जात आहे.
कोरोनाच्या आधी रेशन कार्ड धारकांना रास्त भावात हे रेशन उपलब्ध होत होते. पण, शासनाच्या या योजनेचा काहीजण अपात्र असतानाही लाभ घेत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे शासनाच्या माध्यमातून आता अशा अपात्र लोकांवर कठोर कारवाई केली जात आहे. जे लोक रेशन कार्ड साठी अपात्र असतानाही याचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे.

या लोकांचे रेशन कार्ड कायमचे बंद होणार
शासनाच्या नियमानुसार ज्या लोकांकडे 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट/दुकान, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर आहे अशा लोकांना रेशन दिले जाऊ शकत नाही. तसेच, ज्या लोकांकडे शस्त्र परवाना आहे त्यांना देखील रेशनचा लाभ दिला जाऊ शकत नाही.
एवढेच नाही तर ग्रामीण भागात ज्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त आहे आणि शहरी भागात ज्या कुटुंबाच उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त आहे अशा लोकांना देखील रेशनचा लाभ मिळतं नाही.
यामुळे जे लोक या निकषांची पूर्तता करत नसतील त्यांनी आपले रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अपात्र असणाऱ्या नागरिकांनी जर रेशन कार्ड सरेंडर केले नाही तर पुरवठा विभागाकडून अशा अपात्र शिधापत्रिकाधारकांवर कारवाई होणार आहे.
अशा अपात्र लोकांकडून ज्या तारखेला अपात्र झाले असतील त्या तारखेपासून रेशनची रक्कम वसूल केली जाणार आहे. ही रक्कम 29 रुपये प्रति किलो या दराने वसूल केली जाणार आहे. यामुळे जर तुम्हीही रेशन कार्ड साठी अपात्र असाल तर एक फॉर्म भरून तुमचे रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करायचे आहे.
अर्ज कुठं डाऊनलोड करणार
जर तुम्ही रेशन कार्ड साठी अपात्र असाल तर रेशन कार्ड सरेंडर फॉर्म या लिंक वरून तुम्ही अर्ज डाऊनलोड करून हा अर्ज आणि तुमचे रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करू शकता.