Ration Card News : राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील काही रेशन कार्ड धारकांचा यापुढे रेशन मिळणार नाही अशी माहिती समोर येत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून लाभ घेणाऱ्या रेशनकार्डधारकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेशन कार्ड धारकांकडे आणखी आठ ते नऊ दिवसांचा काळ बाकी आहे.

खरेतर, योजनेतील पात्र प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी वारंवार मुदत वाढ देण्यात आली आहे. मात्र अनेकदा संधी देऊनही अनेक रेशन कार्ड धारकांनी अजून केवायसी पूर्ण केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
केवायसी साठी सरकारकडून तीनदा मुदत वाढ
रेशन कार्ड धारकांना ई-केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून यासाठी सरकारने आधीच तीन वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र असे असतानाही शहापूर तालुक्यातील हजारो रेशन कार्ड धारकांची केवायसी ची प्रक्रिया प्रलंबित आहे.
तालुक्यातील सुमारे 43 हजार शिधापत्रिकाधारकांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याची धक्कादायक आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. खरेतर शासनाने यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे.
यामुळे या संबंधित शिधापत्रिका धारकांना 31 तारखेपर्यंत केवायसी करावी लागणार आहे अन्यथा त्यांना रेशनवरील धान्याचा लाभ मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापासून धान्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती तहसील कार्यालयांमधून समोर आली आहे. यामुळे ज्या रेशन कार्ड धारकांनी अजून केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन जाणकारांकडून केले जात आहे.
ई-केवायसी कुठे करता येणार ?
ज्या रेशन कार्ड धारकांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी आपल्या जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन, आधार क्रमांक व रेशनकार्ड तपशील सादर करून केवायसी पूर्ण करून घ्यावे असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले आहे.
याशिवाय प्ले स्टोअरवरून मेरा केवायसी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून सुद्धा रेशन कार्ड धारकांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यामुळे ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्यांचा धान्याचा लाभ बंद होऊ शकतो.