Ration Card Rules : रेशन कार्डधारकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. जर तुमच्याकडे ही पिवळे, केशरी अन अंत्योदय रेशन कार्ड असेल अन तुम्हाला शासनाकडून मोफत अन्नधान्य मिळत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर सरकारकडून गोरगरीब जनतेसाठी सातत्याने वेगवेगळे निर्णय घेतले जातात. सर्वसामान्य गरजवंत नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात.
मात्र या योजनांचा काही लोक पात्र नसतानाही लाभ घेत असतात. रेशनसंदर्भात देखील तसेच आढळून आले आहे. अनेकजण रास्तभावात मिळणाऱ्या रेशन साठी अपात्र असतानाही रेशनिंगचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे आता सरकार ॲक्शन मोडवर आले असून अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे देशातील अनेकांचे रेशन कार्ड रद्द होणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार जे लोक मोफत रेशन साठी अपात्र ठरतात अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द करण्याचे निर्देश शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. यानुसार शासनाकडून पाठवण्यात आलेल्या यादीमधील रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाई पुरवठा विभागाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार जे लोक आयकर भरतात अन ज्यांच्याकडे दहा एकरांपेक्षा अधिक शेतजमीन आहे असे लोक शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ घेऊ शकत नाही.
म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकर पेक्षा अधिक शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे. दरम्यान, आता शासनाकडून अशा लोकांना ओळखले जात असून अशा लोकांच्या शिधापत्रिका रद्द केल्या जात आहेत.
विशेष म्हणजे अशा लोकांची यादी करून शासनाने आधीच संबंधित जिल्ह्यातील पुरवठा विभागाकडे पाठवली सुद्धा आहे. म्हणजेच आगामी काळात अनेकांचे रेशन कार्ड आता रद्द होणार आहे. जे लोक अपात्र असूनही रेशनचा लाभ घेत होते त्यांना आता रेशन मिळणार नाही आणि त्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे.
धान्य मिळणारे रेशन कार्ड रद्द करून अशा लोकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच ज्या लोकांनी चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भरलेले नसेल, आधार लिंक केलेले नसेल अशा लोकांचे देखील रेशन कार्ड रद्द होणार आहे.
जे लोक आयकर भरत असल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे अपात्र असतील आणि शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त रेशनचा लाभ घेत असतील तर अशा लोकांकडून 27 रुपये प्रति किलो या दराने त्यांना मिळणाऱ्या धान्याची किंमत वसूल केली जाणार आहे.
ही वसुली अपात्र ठरल्याच्या तारखेपासून केली जाणार आहे हे विशेष. यामुळे जे लोक आयकर भरत असतील तसेच ज्या लोकांकडे दहा एकर पेक्षा अधिक शेतजमीन असेल त्यांनी आपले रेशन कार्ड पुरवठा विभागाकडे जमा केले पाहिजे आणि पांढरे रेशन कार्ड घेतले पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर पुरवठा विभागाकडून कारवाई होणार नाही.