रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय ! ऐतिहासिक निर्णयाचा फायदा होणार की तोटा ? वाचा सविस्तर

Published on -

Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. सरकार शिधापत्रिका धारकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेणार असून यामुळे धान्य वाटपात असणारी विषमता बऱ्यापैकी दूर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रातील सरकारकडून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रेशन वितरणाच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे.

अंत्योदय रेशन कार्ड धारकांना सध्या 35 किलो धान्य दिले जाते. पण आता नव्या निर्णयामुळे काही कुटुंबांना जास्त धान्य मिळणार आहे तर काही कुटुंबांचे धान्य कमी होणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी नवा निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे.

या अंतर्गत रेशन वितरणाच्या नियमांमध्ये ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय होणार आहे. सद्यस्थितीला अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबाला दिले जाणारे धान्य हे प्रति कुटुंब या आधारावर दिले जाते. म्हणजे कुटुंबात किती लोक आहेत यानुसार नाही तर कुटुंबानुसार धान्य दिले जाते.

अर्थात कुटुंबात दोन लोक असले तरी 35 किलो धान्य मिळाला आणि सात लोक असेल तरी देखील 35 किलो धान्य मिळेल. मात्र या असमान वितरणामुळे काही कुटुंबांना गरजेपेक्षा धान्य मिळत आहे तर काही कुटुंबांना फारच कमी धान्य मिळते.

हेच कारण आहे की आता अंत्योदय रेशन कार्ड धारकांना सुद्धा प्रतिव्यक्ती या आधारावर धान्य वितरण करण्यात येईल अशी माहिती पुरवठा विभागाकडून समोर आली आहे. या संदर्भात केंद्रीय अन्न मंत्रालयाचा अहवाल समोर आला आहे.

यानुसार ही नवीन प्रणाली पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. याबाबत अन्न मंत्रालयाने देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या अंत्योदय रेशन कार्ड धारकांना प्रति कुटुंब 35 किलो धान्य दिले जाते. कुटुंबात दोन सदस्य असोत किंवा सातपेक्षा जास्त प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य मिळते.

पण त्यामुळे काही लहान कुटुंबांना प्रमाणापेक्षा जास्त धान्य मिळते, तर मोठ्या कुटुंबांना अपुरे धान्य मिळते. आता हीच विषमता दूर करण्यासाठी प्रति व्यक्ती 7.5 किलो धान्य वाटपाची योजना तयार करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

नवीन निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली की चार किंवा त्याहून कमी सदस्य असलेल्या कुटुंबांना सध्यापेक्षा कमी धान्य मिळेल. तर पाच किंवा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांना जास्त अन्नधान्य मिळणार आहे. सध्या देशात 1.71 कोटी अंत्योदय रेशन कार्डधारक आहेत. यातील बहुसंख्य कुटुंबात पाच किंवा त्यापेक्षा कमी सदस्य आहेत.

यामुळे नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर सरकारचे धान्य बचत होईल आणि हे धान्य योग्य गरजू लोकांना मिळेल असा दावा सरकारने केला आहे. खरे तर सामान्य रेशन कार्डधारकांना पाच किलो धान्य दिले जाते. दरम्यान आता नव्या निर्णयानुसार अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्यांना प्रति सदस्य साडेसात किलो धान्य मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News