रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला किती पगार मिळतो? पगाराव्यतिरिक्त आणखी काय-काय सुविधा मिळतात, भत्ते किती मिळतात?

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर नेहमीच चर्चेत राहतात. तुम्हाला आरबीआयच्या गव्हर्नरला किती पगार मिळतो याची कल्पना आहे का? नाही ना मग आज आपण याच बाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

RBI Governor Salary : सध्या संपूर्ण देशभरात आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार पेन्शन धारकांचा पगार कितीने वाढणार अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहेत.

दरम्यान आज आपण देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरचा म्हणजेच आरबीआयच्या गव्हर्नरच्या पगाराबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील बँकिंग व्यवस्था आणि चलन पुरवठा नियंत्रित करणारी संस्था आहे.

तसेच, RBI भारतीय रुपया जारी करते तसेच देशाचे चलनविषयक धोरण ठरवत असते. दरम्यान आता आपण आरबीआय गव्हर्नरला किती पगार मिळतो? पगाराव्यतिरिक्त त्यांना कोणते भत्ते आणि सुविधा दिल्या जातात, याचा आढावा घेणार आहोत. 

आरबीआय गव्हर्नरला किती पगार मिळतो ? 

मीडिया रिपोर्ट्सवर जर विश्वास ठेवायचं झाले तर सध्या आरबीआय गव्हर्नरला दरमहा अडीच लाख रुपये पगार दिला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे आरबीआय गव्हर्नरला मिळणारा पगार हा भारताच्या पंतप्रधानांच्या पगारापेक्षा जास्त आहे.

तसेच, आरबीआय गव्हर्नरला महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांचा सुद्धा लाभ दिला जातो. अशा तऱ्हेने आरबीआय गव्हर्नरला दरमहा एकूण 2.87 लाख रुपये पगार मिळतो. हा पगार कॅबिनेट सचिवांच्या पातळीवर आहे आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा थोडा जास्त आहे. 

पगाराव्यतिरिक्त कोणकोणते लाभ मिळतात?

आरबीआय गव्हर्नरला पगाराव्यतिरिक्त भारत सरकारकडून राहण्यासाठी घर, गाडी, ड्रायव्हर, गृहिणी आणि इतर अनेक सुविधा मिळत असतात. आरबीआय गव्हर्नरचे घर मुंबईतील पॉश भागातून एक असलेल्या मलबार हिल्समध्ये असते.

या बंगल्याची अंदाजे किंमत 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जी पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियाकडून भाड्याने घेतली जाते आणि आरबीआय गव्हर्नर आपल्या कार्यकाळा दरम्यान वास्तव्याला असतात.

आरबीआय गव्हर्नर आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत वैद्यकीय सुविधा सुद्धा दिल्या जातात. याशिवाय, त्यांना गाडी आणि ड्रायव्हर देखील सरकारकडून पुरवले जातात. पण निवृत्तीनंतर, त्यांना पेन्शन मिळत नाही, परंतु त्यांना आयुष्यभर वैद्यकीय आणि इतर भत्ते मिळतात.

सोबतच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान उच्च श्रेणीत वाहतूक सुविधा पुरवल्या जातात. पण ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुविधा फक्त सरकारी कामासाठी दिली जाते, मात्र त्यांना वैयक्तिक प्रवासाचा खर्च स्वतः करावा लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!