RBI Monetary Policy : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. खरे तर उद्या RBI Monetary Policy म्हणजे आरबीआयचे चलनविषयक धोरण जाहीर केले जाणार आहे. सध्या यासाठी बैठकीचे सत्र सुरू आहे. 7 फेब्रुवारी 2025 रोजी मात्र आरबीआयचे चलनविषयक धोरण जाहीर केले जाईल.
दरम्यान आरबीआय हे चलन विषयक धोरण जाहीर करताना एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावेळी रेपो दर कमी होण्याची अपेक्षा जाणकार लोकांकडून वर्तवली जात आहे. असे झाल्यास सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार असून कर्जाचा ईएमआय कमी होणार आहे.
दरम्यान आज आपण शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आरबीआयचे चलनविषयक धोरण जाहीर करण्यापूर्वी कोणते स्टॉक खरेदी केले पाहिजेत याबाबत माहिती पाहणार आहोत.
स्टॉक मार्केट विश्लेषकांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना असे पाच स्टॉक सुचवले आहेत जे आरबीआयचे चलन विषयक धोरण जाहीर करण्यापूर्वी खरेदी केले जाऊ शकतात. चला तर मग गुंतवणूकदारांनी कोणते पाच स्टॉक खरेदी केले पाहिजेत? याबाबत माहिती पाहुयात.
हे 5 स्टॉक खरेदी केल्यास गुंतवणूकदारांना मिळणार जोरदार परतावा
आयटीसी : आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्च चे सीनियर मॅनेजर गणेश डोंगरे यांनी आयटीसी स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यांनी हा स्टॉक 448 रुपयांमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी 440 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तसेच यासाठी 475 रुपयांचे टार्गेट प्राईज ठेवण्यात आले आहे.
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड: आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्च चे सीनियर मॅनेजर गणेश डोंगरे यांनी अदानी पोर्ट्सचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी हा स्टॉक 1145 रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी 1177 रुपयांची टारगेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे आणि 1120 रुपयांचा स्टॉप लॉस सुद्धा देण्यात आला आहे.
रॅमको सिमेंट्स लिमिटेड : गणेश डोंगरे यांनी रॅमको सिमेंटचा स्टॉक 900 रुपयांवर खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी 925 रुपयांची टारगेट प्राईज दिली आहे. तसेच यासाठी 884 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइझ लिमिटेड: चॉईस ब्रोकिंग चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागडिया यांनी अपोलो हॉस्पिटलचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक 6944 रुपयांमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच यासाठी 7430 रुपयांची टार्गेट प्राईज ठेवण्यात आली आहे आणि स्टॉप लॉस 6700 रुपयांवर लागू करण्याची शिफारस केली आहे.
eClerx Services Limited : बागडिया यांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी 3286.90 मध्ये हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी 3315 रुपयांची टार्गेट प्राईस ठेवली आहे आणि 3172 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.