2023 मध्ये बंद झालेल्या 2,000 च्या नोटांबाबत आरबीआयचा मोठा खुलासा ! आताही 2 हजाराची नोट……

सरकारने जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद केल्यात अन नवीन 500 आणि 2000 रुपयांची नोट बाजारात आणली. मात्र 2023 मध्ये नव्याने बाजारात आणली गेलेली दोन हजार रुपयांची नोट देखील सरकारने बंद केली. दरम्यान आता आरबीआय कडून दोन हजार रुपयांच्या नोटबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

Published on -

RBI On 2000 Rupee Note : 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले, सत्ता स्थापित केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठे निर्णय घेतलेत. यातील काही निर्णय हे चांगलेच गाजलेत अन काही निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाची देखील स्थिती निर्माण झाली. असाच एक निर्णय म्हणजे नोटाबंदीचा.

सरकारने जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद केल्यात अन नवीन 500 आणि 2000 रुपयांची नोट बाजारात आणली. मात्र 2023 मध्ये नव्याने बाजारात आणली गेलेली दोन हजार रुपयांची नोट देखील सरकारने बंद केली.

आरबीआयने 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता आरबीआय कडून दोन हजार रुपयांच्या नोटबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने शनिवारी (01 मार्च 2025) सांगितले की, 2 हजार रुपयांच्या 98.18% नोट्स बँकिंग सिस्टमकडे परत आल्या आहेत.

आता जनतेकडे अशा नोट्स केवळ 6,471 कोटी रुपये आहेत. 19 मे 2023 रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा अर्थात या नोटा मागे घेण्याची घोषणा केली होती.

19 मे 2023 रोजी म्हणजेच ज्या दिवशी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या त्या दिवशी 2000 रुपयांच्या बँकेच्या नोट्सचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते, जे 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत 6471 कोटी रुपये इतके कमी झाले आहे.

सेंट्रल बँकेने आपल्या एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, 19 मे 2023 पर्यंत बाजारात उपलब्ध असलेल्या 2000 रुपयांच्या 98.18 टक्के नोटा परत आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांची नोट असेल ते या नोटा अजूनही बदलून घेऊ शकतात.

7 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशातील सर्वच बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळत होत्या. मात्र सध्या स्थितीला निवडक ठिकाणी दोन हजाराच्या नोटा बदलून मिळत आहेत.

आरबीआयच्या 19 कार्यालयांमध्ये ही सुविधा सद्यस्थितीला उपलब्ध आहे. 9 ऑक्टोबर 2023 पासून आरबीआयच्या कार्यालयांमध्ये दोन हजाराची नोट बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जी की अजूनही सुरू आहे.

या व्यतिरिक्त, सर्वसामान्य जनता 2000 रुपयाची नोट देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसकडून आरबीआयच्या कोणत्याही कार्यालयाकडे पाठवू शकतात आणि त्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या खात्यात नोटांच्या मूल्यइतके पैसे जमा केले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe