‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांवर लक्ष्मीची असते विशेष कृपा, कधीच नाही भासत पैशांची कमतरता; कायम मिळतो पैसाच पैसा

numerology

ज्योतिष शास्त्र आणि अंकशास्त्र यांना भारतामध्ये खूप महत्त्वाचे स्थान असून ग्रह तारे इत्यादींचा व्यक्तींवर पडणारा प्रभाव याचा प्रामुख्याने अभ्यास ज्योतिष शास्त्रामध्ये केला जातो. अगदी त्याच पद्धतीने अंकशास्त्र देखील महत्त्वाचे असून व्यक्तींचा जन्म ज्या तारखांना होतो त्यावरून संबंधित व्यक्तीचे आयुष्य कसे राहील याबाबतचे विश्लेषण अंकशास्त्रामध्ये केले जाते.

अंकशास्त्रामध्ये मुलांकाला खूप महत्त्व असून अंकशास्त्रानुसार पाहिले तर या मुलांकाचा थेट संबंध हा ग्रहांशी आणि देवाशी असतो. त्यामुळे या मुलांकावरून तुमचा स्वभाव आणि भविष्य कसे आहे हे ठरवले जाते.

आपल्याला माहित असेलच की व्यक्तीची जन्मतारीख काय आहे त्यावरून त्या व्यक्तीचा मुलांक काढला जातो. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये सहा मुलांक असलेल्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे जाते? याबद्दलची माहिती बघणार आहोत.

 सहा मुलांक असणाऱ्या व्यक्तीवर लक्ष्मीची असते विशेष कृपा

कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख काय आहे यावरून त्या व्यक्तीचा मुलांक ठरवला जात असतो. त्याप्रमाणे ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पंधरा, 24 आणि सहा तारखेला झालेला असतो अशा व्यक्तींचा मुलांक सहा असतो. ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर ज्या व्यक्तींचा मुलांक सहा असतो

त्यांचा संबंध धनवैभवाचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाशी असतो आणि या लोकांवर या ग्रहाची विशेष कृपा दिसून येते. यामुळे सहा मुलांक असलेल्या लोकांना पैशांची कमतरता भासत नाही व लक्ष्मीचा आशीर्वाद या लोकांवर कायम असतो. तसेच सहा मुलांक असलेले व्यक्ती हे खूप भाग्यवान समजले जातात.

लक्ष्मीची कृपा कायम असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात धनसंपत्ती भरभरून राहते व आर्थिक समस्या देखील जाणवत नाही. कारण सहा मुलांक असलेल्या व्यक्तींवर लक्ष्मीची छाया असल्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती सतत होत असते.हे लोक नेहमी आनंदी व सुखी समाधानी दिसून येतात.

 सहा मुलांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?

तसेच सहा मुलांक असलेल्या लोकांचा स्वभाव पाहिला तर तो अत्यंत साधा आणि सरळ असतो. या लोकांना इतरांची काळजी घ्यायला खूप आवडते. तसंच इतर लोकांबरोबर ते नेहमी आपुलकीने वागतात व काळजी घेत राहतात.

कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या बळावर हे लोक त्यांचे सर्व कामे पूर्ण करतात व कित्येक कठीण आव्हानांना समर्थपणे तोंड देतात. हे लोक कायम मेहनती असतात व मेहनतीच्या जोरावर यश मिळवतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe