Real Estate: घर किंवा प्लॉट खरेदी करताना फक्त ‘ही’ 2 कागदपत्रे तपासा, टळेल फसवणूक आणि वाचेल पैसा

Published on -

Real Estate:- सध्या मोठ्या प्रमाणावर घर किंवा प्लॉट किंवा कोणत्याही प्रकारच्या जमिनींचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. ग्रामीण भाग असो की शहरी भाग अशा प्रत्येक ठिकाणी आता खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. परंतु अशा प्रकारचे व्यवहार हे आर्थिक दृष्टिकोनातून प्रचंड मोठे असतात व त्यामुळे अनेक बारीक-सारीक गोष्टींना धरून काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. कारण आपण बऱ्याचदा वाचतो किंवा ऐकतो की अशा व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. एकच घर किंवा प्लॉट एकापेक्षा जास्त जणांना विक्री करण्याची अनेक प्रकरणे समोर येतात. अशा प्रकारची फसवणूक ही बनावट रजिस्ट्रीच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला देखील अशा व्यवहारांमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असून जेणेकरून तुमची फसवणूक होऊ शकणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्लॉट किंवा घर किंवा कुठल्याही प्रकारच्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर काही कागदपत्रे तपासणे अतिशय गरजेचे आहे. कारण यामुळे तुमची फसवणूक कोणीच करू शकत नाही. चला तर मग या लेखात आपण या संबंधीची माहिती बघू.

प्रॉपर्टी व्यवहारात फसवणूक टाळण्यासाठी ही कागदपत्रे तपासा

1- टायटल इन्शुरन्स- हा एक विमा असून तुम्हाला संभाव्य नुकसानापासून वाचवू शकतो व तुमचे पैसे यामध्ये सुरक्षित राहू शकतात. तुम्हाला जर प्लॉट घ्यायचा असेल तर अशा व्यवहारांमध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुम्ही टायटल इन्शुरन्स घेणे खूप गरजेचे आहे. हा एक प्रकारचा विमा आहे व या माध्यमातून प्लॉटची मालकी स्पष्ट असल्याची खात्री मिळत असते. यामध्ये जर काही अनियमितता तुम्हाला दिसून आली तर टायटल इन्शुरन्स मुळे तुमचे होणारे नुकसान टळते आणि तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतात.

2-इन्कम्बरन्स(Encumbrance) सर्टिफिकेट- जेव्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारांमध्ये आपण बुकिंगचे पैसे देतो त्याआधी तुम्ही सब रजिस्ट्रार ऑफिसला भेट देणे गरजेचे आहे व त्या ठिकाणी तुम्ही घेत असलेल्या प्लॉटचे भार प्रमाणपत्र मागावे. यामुळे सदरील प्लॉटवर कुठल्याही प्रकारचे कर्ज किंवा वाद किंवा कायदेशीर समस्या आहे की नाही याची तुम्हाला खात्री करता येते. बरेच जण अशा व्यवहारांमध्ये कुठलीही खात्री न करता पैसे देऊन टाकतात आणि नंतर सदरील प्लॉट दुसऱ्याच्या नावावर रजिस्टर्ड असल्याचे दिसून येते व आपले नुकसान होते. त्यामुळे हे छोटे सर्टिफिकेट तुम्हाला मोठ्या नुकसानापासून वाचवू शकते.

3- बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करणे- तिसरा उपाय म्हणजे तुम्ही प्लॉट खरेदी करण्यासाठी बँकेकडून काही रकमेचे कर्ज घेतले तरी तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण कुठलीही बँक कर्ज देण्यापूर्वी सदरील प्लॉटची संपूर्ण कायदेशीर तपासणी करतात. सदरील प्लॉटची कागदपत्रे बरोबर आहेत की नाही, तसेच कोर्टात काही प्रकरण प्रलंबित आहे की नाही व मालकी स्पष्ट आहे का याची देखील खात्री करतात व तरच तुम्हाला कर्ज मंजूर करतात. त्यामुळे आपसूकच बँकेकडून सदरील प्लॉट किंवा प्रॉपर्टीची खातरजमा केली जाते व सदरील प्रॉपर्टीचे टायटल क्लिअर असेल तरच तुम्हाला कर्ज मंजूर होते व ही प्रक्रिया तुमच्यासाठी देखील खूप फायद्याची ठरते. कारण या प्रक्रियेत आपसूकच सदरील प्रॉपर्टीची पडताळणी तुम्हाला करता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe