मोदी सरकारची रील्स बनवणाऱ्यांसाठी मोठी घोषणा ! एक मिनिटाचा Reel बनवा आणि 15,000 रुपयांचे बक्षीस मिळवा

Published on -

Reel Competition : अलीकडे इंस्टाग्राम, युट्युब,  व्हाट्सअँप अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. देशातील बहुसंख्य नागरिक समाज माध्यमांचा उपयोग करतात. देशात 5G च्या पदार्पणानंतर समाज माध्यमांचा वापर अधिक वाढला आहे. यामुळे सोशल मीडिया इनफ्लून्सर्सची संख्या देखील वाढली आहे.

अनेकजण इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील्स बनवतात आणि चांगले पैसे सुद्धा कमवत आहेत. इनफ्लून्सर्स मनोरंजन, माहितीपर व्हिडिओ बनवतात. सोशल मीडिया इनफ्लून्सर ब्रँड प्रमोशन तसेच गुगल ऍडसेन्सच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत.

दरम्यान जर तुम्हालाही रील बनवण्याचा छंद असेल तर तुमच्यासाठी मोदी सरकारने एक नवीन योजनेची घोषणा केली आहे. केंद्रातील सरकारकडून रील बनवणाऱ्यांसाठी डिजिटल इंडिया डिकेड रील स्पर्धा नावाची एक नवीन स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये जर तुमच्या रील्सची निवड झाली तर तुम्हाला 15000 रुपयांपर्यंतची रोख रक्कम मिळणार आहे. येत्या दोन दिवसांनी म्हणजेच एक ऑगस्ट 2025 पासून ही नवीन स्पर्धा सुरू होणार आहे. आता आपण या स्पर्धेचे स्वरूप पाहुयात आणि कोणत्या विषयावरील रील बनवता येतील याची माहिती जाणून घेऊयात.

कशी राहणार स्पर्धा?

या स्पर्धेत जर भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला एका मिनिटाचा रील बनवायचा आहे. मात्र तुम्हाला ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव, सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या एप्लीकेशनचा उपयोग, यूपीआय पेमेंटचे फायदे तसेच आरोग्य आणि तंत्रज्ञान या विषयावर रील बनवावे लागणार आहेत.

रीलचा व्हिडिओ हा पोर्ट्रेट मोड मधला असावा. व्हिडिओ mp4 फॉरमॅट मधला आणि हाय रिझोल्युशनचा असणे अपेक्षित आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त एक मिनिटाचा असू शकतो.

कोणत्याही भाषेत हा रील बनवता येणार आहे मात्र इंग्रजी आणि हिंदीमध्ये रील बनवणाऱ्यांना प्राधान्य मिळणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये रील बनवल्यानंतर तुम्हाला तो रील सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावा लागणार आहे.

https://www.mygov.in/task/decade-digital-india-reel-contest/ या संकेतस्थळावर तुम्ही तुमचा रील अपलोड करू शकता. या स्पर्धेत जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर एक ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:45 पर्यंत तुम्हाला तुमचा रील या संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. 

कोणाला मिळणार 15,000 रुपयांचे बक्षीस ? 

या स्पर्धेत जे रील्स टॉप 10 मध्ये येतील त्यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. त्या पुढील 25 रील्सला प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे आणि त्यापुढील 50 रील्सला प्रत्येकी 5 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. नक्कीच कंटेंट क्रियटर लोकांसाठी सरकारची ही स्पर्धा फायद्याची राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!