Rekha Jhunjhunwala Portfolio Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात सप्टेंबर 2024 पासून सातत्याने घसरण पाहायला मिळत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत, मात्र या घसरणीच्या काळात सुद्धा बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला जोरदार परतावा दिला आहे.
तर दुसरीकडे गेल्या तीन महिन्यात 32% हुन अधिक घसरलेला एक स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न देताना दिसणार असे बोलले जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एनसीसीच्या स्टॉकमध्ये गेल्या तीन महिन्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

पण टॉप ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी सकारात्मक संकेत मिळत आहेत. ब्रोकरेजने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत आज आपण याबाबतची संपूर्ण डिटेल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे डिटेल ?
शुक्रवारी, 21 फेब्रुवारी 2025 रोजी NCC कंपनीचा स्टॉक व्यवहारादरम्यान तेजीत राहिला, या दिवशी हा शेअर 2.5 टक्क्यांनी वधारून 197 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहचला होता. मात्र गेल्या तीन महिनयात हा शेअर 32 टक्के तर गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये 23 टक्क्यांची घट झाली आहे.
म्हणजे सध्या हा स्टॉक शेअर बाजारात संघर्ष करताना दिसतोय. पण तरीही देशांतर्गत ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने या शेअरवर ‘बाय’ रेटिंग दिले आहे अर्थातच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या स्टॉक साठी ब्रोकरेज कडून 213 रुपयांचे टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आले आहे.
म्हणजेच सध्याच्या किमतीपेक्षा यात आगामी काळात दहा टक्क्यांची वाढ होईल असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. असे झाल्यास आगामी काळात गुंतवणूकदारांना या स्टॉक मधून चांगला परतावा मिळू शकणार आहे.
5 वर्षात गुंतवणूकदारांना किती परतावा मिळाला?
या स्टॉकची अलीकडील कामगिरी फारशी उल्लेखनीय राहिलेली नाही. गेल्या तीन महिन्यात हा स्टॉप 32 टक्यांनी तर गेल्या एका महिन्यात या स्टॉकच्या किमती 23 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मात्र गेल्या पाच वर्षांच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा दिला आहे.
गत पाच वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 347% रिटर्न दिले आहेत आणि गेल्या तीन वर्षांमध्ये हा स्टॉक 193 टक्क्यांनी वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे NCC ltd च्या शेअर्समध्ये रेखा झुनझुनवाला यांची 10% हिस्सेदारी आहे.