एकरकमी इतक्या लाखांची गुंतवणूक केल्यास तुमच्या निवृत्तीनंतर मिळणार 1 कोटी 80 लाख रुपये! कस ते पहाचं

Retirement Planning : आपण सर्वजण उतारवयात आनंदात राहता यावे, पैशांची अडचण भासू नये यासाठी आर्थिक नियोजन करत असतो. खरेतर, जोपर्यंत आपण तरुण असतो तोवर काबाडकष्ट करून आपले आयुष्य आनंदात घालवतो.

पण उतार वयात कोणालाच काम करता येणे शक्य नाही यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम नियोजन असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सुरुवातीपासूनच थोडे-थोडे पैसे गुंतवले किंवा एकरकमी मोठी रक्कम गुंतवली तर तुम्ही निवृत्तीनंतर मोठा फंड तयार करू शकता.

तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याजेचा फायदा मिळणार आहे अन यामुळे तुमची गुंतवणूक कालांतराने वाढणार आहे. अवघ्या काही लाखाची गुंतवणूक केल्यास तुम्ही एका ठराविक कालावधीनंतर कोट्यावधी रुपयांचा फंड तयार करू शकता.

दरम्यान आज आपण सहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कशा पद्धतीने 1 कोटी 80 लाख रुपये मिळू शकतात याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कोट्यावधीचा रिटायरमेंट फंड हवा असेल तर लवकर गुंतवणूक करा

सेवानिवृत्तीच्या निधीसाठी म्हणजेच रिटायरमेंट फंड साठी तुम्ही लहान वयातच गुंतवणूक सुरू करणे नेहमीच चांगले असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने मासिक पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि त्यावर 12 टक्के वार्षिक परतावा मिळविला तर तो अंदाजे 35 वर्षांत 35.25 कोटी रुपयांचा निधी तयार करू शकतो.

महत्त्वाचे म्हणजे या कालावधीत गुंतवणूकदाराची गुंतवणूक केवळ 21,00,000 रुपये असेल. त्याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीने 5 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली आणि त्यावर 12 टक्के वार्षिक परतावा मिळविला तर तो 30 वर्षांत अंदाजे 1,49,79,961 रुपयाचा फ़ंड तयार करू शकतो.

6 लाखांची गुंतवणूक केल्यास 10 वर्षात किती मिळणार परतावा?

जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युचुअल फंडमध्ये लमसम 6 लाख रुपये गुंतवले अन 12 टक्के दराने त्याला परतावा मिळाला तर 10 वर्षांत या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला बारा लाख 63 हजार 509 रुपये एवढा परतावा मिळणार आहे. म्हणजेच या काळात गुंतवणूकदाराला 18 लाख 63 हजार 509 रुपये मिळणार आहेत.

सहा लाखाची गुंतवणूक केल्यास वीस वर्षात किती परतावा मिळणार?

सहा लाखाची गुंतवणूक केल्यास 12 टक्के दराने 20 वर्षांत 51,87,776 रुपये एवढे रिटर्न मिळणार आहेत. म्हणजे या काळात गुंतवणूकदाराला एकूण 57,87,776 रुपये मिळतील.

सहा लाखाची गुंतवणूक केल्यास तीस वर्षात किती परतावा?

गुंतवणूकदाराने सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 30 वर्षांत अंदाजित भांडवली नफा 1,73,75,953 रुपये पर्यंत पोहोचेल आणि अंदाजे कॉर्पस 1,79,75,953 रुपये इतके राहील. येथे आपण पाहतोय की दर 10 वर्षांनी कार्पस फारच वेगाने वाढत आहे.

चक्रवाढ व्याज लागू असल्याने गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म मध्ये जास्तीचा परतावा मिळताना दिसतोय. त्यामुळे निवृत्तीनंतर जर तुम्हाला मोठा फंड हवा असेल तर लवकरात लवकर गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe