Rice Farming : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका तसेच भात या पिकाची सर्वाधिक शेती केली जाते. राज्यातील भात उत्पादनाचा विचार केला असता राज्यात भाताचे उत्पादन सर्वाधिक विदर्भात घेतले जाते. विदर्भात मात्र संपूर्ण विदर्भात नव्हे तर भात लागवड प्रामुख्याने पूर्व विदर्भात अर्थातच नागपूर विभागात सर्वत्र पाहायला मिळते.
नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भात शेती होते. याव्यतिरिक्त भाताची लागवड कोकणात सर्वाधिक पाहायला मिळते आणि कोकणपाठोपाठ सह्याद्रीचा घाटमाथा म्हणून ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर या भागात देखील कमी अधिक प्रमाणात भात लागवड पाहायला मिळते.
नासिक जिल्ह्यातील मिनी कोकण अशी ओळख असलेल्या कळवण व आजूबाजूच्या आदिवासी बहुल भागात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एकंदरीत राज्यात भात लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
हे पण वाचा :- सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आणि त्यांच्या विशेषता, पहा…
राज्यातील बहुतांशी शेतकरी भात पिकावर अवलंबून आहे. मात्र भात उत्पादक शेतकऱ्यांपुढे एक ना अनेक संकटे उभी आहेत. भात पिकाला अधिक पाणी लागत असल्याने या पिकाची शेती आधीच भात उत्पादकांसाठी तोट्याचा व्यवसाय सिद्ध होत आहे.
तसेच भाताची उत्पादकता देखील गेल्या काही दशकात कमी झाली आहे. पीक उत्पादकता कमी होण्यात वेगवेगळी कारणे आहेत. तणामुळे देखील पीक उत्पादकता कमी झाल्याचे उघडकीस आले आहे. यात धान पिकामध्ये आढळणारे लहान आणि मोठ्या पानाच्या लव्हाळा व घाणेरीसारख्या तणामुळे उत्पादनात घट होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
अशातच मात्र भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भात पिकातील तणाचा समूळ नाश करण्यासाठी क्रिस्टल या कंपनीने अन्य दोन कंपनी सोबत संयुक्तपणे काम करून एका तणनाशकाची निर्मिती केली आहे. हे तणनाशक यंदाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
हे पण वाचा :- 10वी, 12वीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा हजार रुपये ! कोणते विद्यार्थी राहणार पात्र? वाचा….
कंपनीने नुकतीच भात पिकातील लहान आणि मोठ्या तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तणनाशक बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. सिकासो असं या तणनाशकाचं नाव राहणार आहे. या कंपनीने असा दावा केला आहे की, सिकासो तणनाशक भातातील तण समूळ नष्ट करण्यास सक्षम राहणार आहे.
यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस्टल, बैटल आणि मित्सुई ऍग्रीसायन्स इंटरनॅशनल या कंपन्यांनी संयुक्तपणे सिकासो हे तणनाशक विकसित केलंय. तसेच सिकोसाची मागील पाच वर्षात विविध राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती कंपनीचे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
आता मात्र पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कंपनीने सिकोसा बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. निश्चितच, या तणनाशकामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना पिकातील तण नियंत्रणात आणण्यात यश मिळेल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्यातील ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर, वाचा…