Reliance चा ‘हा’ शेअर कंगाल केल्यानंतर आता पुन्हा पैसे बनवून देतोय ! आणखी किती वाढणार ? तज्ञांनी स्पष्टच सांगितलं

रिलायन्स पॉवरचे शेअर्स आज गुरुवारी 10% पर्यंत वाढलेत आणि 43.94 रुपयांवर पोहचले आहेत. या कंपनीची बाजारपेठ 17.09 हजार कोटी पर्यंत वाढली आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या शेअर्समध्ये अचानक तेजी दिसून येत आहे, केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरही यात तेजी दिसून येत आहे अन म्हणून गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.

Tejas B Shelar
Published:

Rpower Share Price Pirce : रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. भारतीय शेअर बाजारात, गुरुवारच्या व्यापारी सत्रात, रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत सुधारणा दिसून येत आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स आज गुरुवारी 10% पर्यंत वाढलेत आणि 43.94 रुपयांवर पोहचले आहेत.या कंपनीची बाजारपेठ 17.09 हजार कोटी पर्यंत वाढली आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या शेअर्समध्ये अचानक तेजी दिसून येत आहे, केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरही यात तेजी दिसून येत आहे अन म्हणून गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.

शेअर्सची किंमत वाढली

एवढेच नाही तर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांकडून रिलायन्स पावरच्या शेअर मध्ये आलेली ही तेजी आगामी काळातही टिकून राहणार का? या स्टॉकबाबत स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून काय म्हटले जात आहे? याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय.रिलायन्स पॉवरच्या स्टॉकच्या किंमती कंपनीच्या तिमाही निकालानंतर वाढल्या आहेत. स्टॉक मध्ये कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर अचानक उसळी आली आहे. यामुळे कंपनीची तूट आता नफ्यात बदलली आहे, ज्यामुळे शेअर्सची किंमत सुद्धा वाढली आहे.

वीज निर्मिती व कोळसा…

अनिल अंबानीची कंपनी रिलायन्स पॉवरने बुधवारी 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे आणि नऊ महिन्यांसाठी त्याचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातल्या रिलायन्स ग्रुपची कंपनी रिलायन्स पॉवर ही प्रायव्हेट सेक्टरची वीज निर्मिती व कोळसा संसाधन क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे. कोळसा, गॅस, हायड्रो आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेच्या आधारे खासगी क्षेत्रातील पॉवर प्रोजेक्ट्सचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ या कंपनीकडे आहे, ज्यात 5,300 मेगावॅटचा ऑपरेटिंग पोर्टफोलिओ आहे. आता आपण कंपनीच्या तिमाही निकालाची माहिती पाहूयात.

कंपनीचा तिमाही निकाल

वित्तीय वर्ष 2025 च्या तिसर्‍या तिमाहीत करानंतर कंपनीचा नफा 42 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे 1,136.75 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर-डिसेंबरच्या कालावधीत रिलायन्स पॉवरची एकूण कमाई 2,159.44 कोटी रुपये झाली, जी एका वर्षापूर्वी याच काळात 1,998.79 कोटी रुपये होती. रिलायन्स पॉवरने एक्सचेंजमध्ये सांगितले की कंपनीच्या EBITDA तिसर्‍या तिमाहीत 492 कोटी रुपये इतका राहिला आहे. वित्तीय वर्ष 2025 च्या तिसर्‍या तिमाहीत कंपनीची निव्वळ संपत्ती 16,217 कोटी रुपये होती.

तज्ञांचा सल्ला

रिलायन्स पॉवरच्या शेअर्सला आता पुन्हा मागणी आली आहे. खरेदीदार मोठ्या प्रमाणात या स्टॉकच्या खरेदीत रस दाखवत आहेत. दरम्यान सेन्ट्रम ब्रोकिंग येथील इक्विटी रिसर्च टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्ह्ज येथील असोसिएशनचे उपाध्यक्ष (एव्हीपी) निलेश जैन म्हणाले की, रिलायन्स पॉवरने गुरुवारी चांगली ब्रेकआउट दिली आहे. तसेच चार्टनुसार हा स्टॉक लवकरच 46 रुपयांवर जाणार असे दिसते. त्यानंतर तो 48.5-50 रुपयांच्या दिशेने जाऊ शकते, म्हणून  काही फायदा घेण्याची शक्यता असू शकते, म्हणून दहा टक्क्यांपेक्षा अधिकचा नफा हवा असल्यास याचा पाठलाग करणे उचित नाही, म्हणून हा स्टॉक 43-42.5 रुपयापर्यंत घसरण्याची प्रतीक्षा करणे चांगले राहणार आहे. लॉंग पोझिशनसाठी गुंतवणूकदारांनी 40.5 रुपयांच्या खाली स्टॉप लॉस ठेवावा. तज्ञांची अशी अपेक्षा आहे की तो अगदी कमी मुदतीत 46-47 रुपये पर्यंत जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe