१ फेब्रुवारी २०२६ पासून आर्थिक बदल; घरगुती बजेटवर होणार थेट परिणाम

Published on -

Rule Change : आज १ फेब्रुवारी २०२६, देशासाठी आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. एका बाजूला लोकसभेत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना, दुसरीकडे महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक आर्थिक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा थेट परिणाम प्रत्येक घराच्या मासिक बजेटवर जाणार आहे.

सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीसंदर्भातील परिस्थिती. तेल कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीला घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता असली तरी घरगुती सिलिंडरच्या दराबाबत अद्याप कोणतीही मोठी घोषणा झाली नाही.

मात्र, या महिन्याच्या अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळेल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यासोबत, सीएनजी आणि विमान इंधन (ATF) दरात होणाऱ्या बदलांमुळे प्रवासाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम शहरांतील टॅक्सी, बस आणि विमान प्रवाशांवर होणार आहे.

बँकिंग क्षेत्रातही मोठे बदल लागू झाले आहेत. SBI आणि इतर बँकांमध्ये नवीन शुल्क संरचना लागू करण्यात आली आहे. यामध्ये बचत खात्यांवरील काही व्यवहारांसाठी शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे, तसेच ATM आणि नेट बँकिंग व्यवहारांसाठीदेखील नवीन नियम लागू होऊ शकतात.

क्रेडिट कार्डसाठीही नवीन नियम लागू झाले असून, काही व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे, ज्यामुळे खरेदीचा खर्च वाढू शकतो.

तंबाखूजन्य पदार्थांवरील करवाढ मुळे सिगारेट आणि गुटख्याच्या किमतीत वाढ झालेली आहे. या बदलाचा थेट परिणाम त्यांचा नियमित वापर करणाऱ्या लोकांच्या खिशावर जाणार आहे.

सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर हे बदल थेट परिणाम करणार आहेत. काही ठिकाणी खर्च कमी करण्याचा मार्ग काढता येईल, तर काही ठिकाणी बजेटचा ताण वाढेल. या परिस्थितीत लोकांनी आपले मासिक बजेट पुन्हा तपासणे आणि गरजेनुसार खर्चाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe