१ फेब्रुवारीपासून बदलणार अनेक नियम; LPG, पान मसाला-सिगारेट महागण्याची शक्यता, FASTag वापरकर्त्यांना दिलासा

Published on -

Rule Change : जानेवारी महिना संपत आला असून, १ फेब्रुवारी २०२६ पासून देशात अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

त्यामुळे नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे काही निर्णय लागू होऊ शकतात. एलपीजी सिलेंडरच्या किमतींपासून ते पान मसाला, सिगारेट, FASTag नियम आणि बँक सुट्ट्यांपर्यंत अनेक घडामोडींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LPG सिलेंडरच्या किमतीत बदलाची शक्यता

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेऊन नवीन दर जाहीर केले जातात. १ फेब्रुवारी २०२६ रोजी घरगुती १४ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. अलीकडेच UAE चे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या भारत दौऱ्यानंतर ऊर्जा क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मात्र सातत्याने चढ-उतार होत आहेत. मागील वेळी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १४.५० रुपयांची कपात होऊन किंमत १८०४ रुपयांवर आली होती. यासोबतच CNG-PNG आणि विमान इंधन (ATF) यांच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

पान मसाला आणि सिगारेट महागणार

१ फेब्रुवारी २०२६ पासून पान मसाला, सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारकडून या उत्पादनांवर अतिरिक्त कर आणि नवीन शुल्क लागू करण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

जीएसटी व्यतिरिक्त आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लावण्यात येणार असल्याने या पदार्थांच्या किंमती लक्षणीय वाढू शकतात. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे.

FASTag नियमात बदल, बँक सुट्ट्या

FASTag वापरकर्त्यांसाठी १ फेब्रुवारीपासून नियमांमध्ये बदल होणार आहेत. NHAI कडून कार, जीप आणि व्हॅनसाठी व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, सक्ती नसल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात शनिवार-रविवार आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमुळे बँका एकूण दहा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकिंग कामांसाठी नागरिकांनी आधीच नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News