RVNL Share Price : आज सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्स मध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज तेजी पाहायला मिळाली असून यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात उत्साहात आहेत. आज शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी बीएसई सेन्सेक्स 530.12 अंकांनी वधारून 77289.93 वर अन एनएसई निफ्टी 164.00 अंकांनी वाढून 23413.50 वर खुला झाला.
आज शेअर बाजारात सूचीबद्ध असणारे अनेक स्टॉक सुद्धा वधारलेत. RVNL च्या स्टॉक मध्ये देखील सध्या तेजी दिसत आहे. यामुळे ब्रोकरेज फर्म कडून या स्टॉकवर पॉझिटिव्ह आउटलुक दिला जात आहे. हा स्टॉक आगामी काळात गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असे म्हटले जात आहे.
दरम्यान आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती आणि आगामी काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना किती परतावा देणार? याबाबत ब्रोकरेजने काय अंदाज दिला आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
RVNL ची शेअर बाजारातील सध्याची स्थिती
काल शुक्रवार, 31 जानेवारी 2025 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा शेअर 9.98 टक्क्यांनी वाढून 485.35 रुपयांवर ट्रेड करत होता. काल या शेअरचा दिवसभरातील उच्चांक 481.50 रुपये होता, तर निच्चांकी स्तर 436.25 रुपये होता. तसेच याचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 647.00 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 213.05 रुपये इतका होता.
या कंपनीच्या मार्केट कॅपिटल बाबत बोलायचं झालं तर सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,00,706 Cr. रुपये इतके आहे. अन या कंपनीवर 5,442 Cr. रुपये इतकं कर्ज आहे. पण आगामी काळात या स्टॉकच्या किमती वाढणार आहेत.
किती वाढणार किमती
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा शेअर बजेट नंतर वाढू शकतो असा अंदाज आहे. Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसंदर्भात सकारात्मक अंदाज वर्तवला असून या स्टॉक साठी ब्रोकरेज कडून ‘Buy’ रेटींग जाहीर करण्यात आली आहे. या शेअरसाठी ब्रोकरेजने 501 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे.
RVNL च्या स्टॉकने गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे?
BSE कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागील 5 दिवसात RVNL चा शेअर 22.76 टक्क्यांनी, मागील 1 महिन्यात 13.37 टक्क्यांनी वाढला आहे. पण, मागील 6 महिन्यात हा शेअर -18.50 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान मागील 1 वर्षात हा शेअर 63.12 टक्क्यांनी, YTD आधारावर रेल विकास निगम लिमिटेड शेअर 13.37 टक्क्यांनी वाढला आहे.
पण मागील 5 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड शेअर 1,861.01 टक्क्यांनी घसरला आहे. पण लॉन्ग टर्ममध्ये रेल विकास निगम लिमिटेड शेअर 2357.47 टक्क्यांनी वाढला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान आता आगामी काळात हा स्टॉक आणखी वाढणार असल्याने या स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसतोय. म्हणून आता आगामी काळात हा स्टॉक वाढणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.