Azad Engineering Share : सचिन तेंडुलकरला या शेअर्समधून मिळाला 531% परतावा, 5 कोटीचे झाले तब्बल इतके कोटी

Published on -

Azad Engineering Share : 20 डिसेंबर 2023 रोजी आझाद अभियांत्रिकी IPO लॉन्च झाला आणि 22 डिसेंबर 2023 रोजी तो बंद देखील झाला. आझाद इंजिनिअरिंग IPO ची इश्यू किंमत 740 कोटी रुपये होती आणि या IPO ची किंमत 499 रुपये ते 524 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.

Azad Engineering IPO वाटपाची तारीख 26 डिसेंबर 2023 ठेवण्यात आली होती. हा IPO NSE आणि BSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आला होता. Azad Engineering IPO ने बाजारात धमाकेदार एन्ट्री केली.

Azad Engineering चे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये 720 रुपये प्रति शेअर दराने सूचीबद्ध झाले आहेत. या शेअर्समध्ये ज्या गुतंवणूकदारानी गुंतवणूक केली होती त्यांना पाहल्यास दिवशी 37% नफा मिळाला आहे.

सचिन तेंडुलकरला आझाद अभियांत्रिकी शेअर्समधून किती परतावा मिळाला?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार क्रिकेटर सचिन तेंडुलकरला Azad Engineering च्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. सचिन तेंडुलकरकडे Azad Engineering चे 4.3 लाख शेअर्स आहेत.

सचिन तेंडुलकरने 2023 मध्ये 114.10 रुपये प्रति शेअरने Azad Engineering चे शेअर्स खरेदी केले होते. आता त्याच शेअर्सची BSE आणि NSE वर किंमत 720 रुपये आहे.

2023 या साली सचिनने Azad Engineering शेअर्स खरेदी करण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आता याच 5 कोटी रुपयांची किंमत 31.5 कोटी रुपये आहे. सचिन तेंडुलकरला या शेअर्समधून तब्बल 531% परतावा मिळाला आहे.

सचिन तेंडुलकरसोबतच अनेक खेळाडूंनी शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे. या खेळाडूंना देखील शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळाला आहे. सायना नेहवाल, पीव्ही सिंधू आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशात तिप्पट वाढ झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News