Sai Baba News : अहिल्या नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिर्डी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र साईनगर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भावीक येतात. या ठिकाणी भाविकांचा अक्षरशः मेळा सजलेला असतो. गुरुपौर्णिमा सारख्या सणांना तर येथे भाविकांची तुंबळ गर्दी पाहायला मिळते.
साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक हजारो किलोमीटर लांबून श्रीक्षेत्र शिर्डीत दाखल होतात. या ठिकाणी साईबाबांचे दर्शन घेतात आणि भरभरून दानधर्म सुद्धा करतात. श्री क्षेत्र शिर्डी आज हिंदू मुस्लिम धर्माचे ऐक्य सांगणारे ठिकाण बनले आहे.

खरे तर शिर्डीतील साई मंदिरातील साईबाबांच्या मुखदर्शनासाठी भाविक आतुर असतात. पण साईबाबा प्रत्यक्षात कसे दिसायचेत? त्यांचा ओरिजनल फोटो तुम्ही कधी पाहिला आहे का. नाही ना मग आज आपण साईबाबांचा ओरिजनल फोटो पाहणार आहोत.
कसे होते साईबाबांचे बालपण
साईबाबांचे बालपण आणि शिक्षण याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही. असे म्हणतात की साईबाबांचा जन्म हा साधारणता 1832 ते 1835 च्या दरम्यान झाला असावा. त्यांचे बालपण हे कमालीचे गुप्त राहिले आहे. त्यांच्या बालपणाबाबत कुठेच काहीही वर्णन पाहायला मिळत नाही.
साईबाबा शिर्डीत कधी आलेत?
दरम्यान 1858 मध्ये साईबाबा शिर्डीत दाखल झाले असावेत अशी माहिती दिली जाते. शिर्डीत आल्यानंतर बाबांनी काही गावाबाहेर निर्जन ठिकाणी वास्तव्य केले आणि त्यानंतर ते शिर्डीतच स्थायिक झालेत. साई बाबा हे अत्यंत साधे जीवन जगत.
अगदीच फकीरासारखे आयुष्य जगून त्यांनी मानवतेचा संदेश दिला. त्यांनी धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश दिला आहे. ते श्रद्धा आणि सबुरी तसेचं “सबका मालिक एक” असे म्हणत असतं.
त्यांनी हिंदू व मुस्लिम दोघांच्याही प्रार्थनापद्धतींचा सन्मान केला आहे. त्यामुळे आजही साईनगरी शिर्डीत हिंदू प्रमाणेच मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतात आणि हीच साईनगरी शिर्डीत येणाऱ्या भाविकांची विशेषता आहे.
साईबाबांनी शिर्डीत अनेक चमत्कार दाखवलेत अन यामुळे साईबाबा हयात असताना देखील देशभरातील भाविक त्यांच्या दर्शनासाठी शिर्डी नगरीत दाखल होत असत.
साईबाबांनी शिर्डीतील द्वारकामाई मशीदेत राहून भक्तजनांना उपदेश दिलेत. साईबाबांनी ऑक्टोबर 1918 मध्ये समाधी घेतली आहे. दरम्यान साईबाबा हयात असतानाचे काही फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आहेत.