Samruddhi Mahamarg : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्याला समृद्धी महामार्गाची भेट मिळाली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन प्रमुख महानगर थेट कनेक्ट झाले आहे. राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यामुळे थेट कनेक्ट झाले.
हा महामार्ग पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन जिथे भरत त्या महाराष्ट्रातील किंबहुना देशातील दोन महत्त्वाच्या शहरांना कनेक्टिव्हिटी देणार आहेत महत्त्वाचा प्रकल्प असून या महामार्गामुळे या दोन्ही शहरांमधील प्रवास फारच वेगवान झाला आहे.

दरम्यान याच समृद्धी महामार्गाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. हा रोड आजवर केवळ खासगी वाहनधारकांपुरताच सीमित होता. मात्र आता समृद्धी महामार्गावर राज्य महामंडळाच्या बसेस सुद्धा धावताना दिसत आहे.
नाशिक परिवहन विभागाने नाशिक–मुंबई (वरळी/बोरिवली) तसेच नाशिक–छत्रपती संभाजीनगरदरम्यान एसी इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या नव्या बससेवांचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गिते यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पर्यावरणपूरक, वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणाऱ्या या शिवाई इलेक्ट्रिक बससेवा हा नाशिक विभागाच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसांना समृद्धी महामार्गावर टोलमाफी देण्यात आल्याने प्रवाशांना कोणतीही अतिरिक्त आर्थिक जबाबदारी न पडता या आधुनिक महामार्गावरून प्रवास करण्याची संधी मिळत आहे.
सध्या नाशिक विभागांतर्गत नाशिक–बोरिवली व नाशिक–छत्रपती संभाजीनगर मार्गांवर जाणाऱ्या व येणाऱ्या एकूण २६ इलेक्ट्रिक बस धावत आहेत. शिवाय, नाशिक–शिवाजीनगर, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, सटाणा, नंदूरबार, कसारा अशा विविध मार्गांसह एकूण ६५ इलेक्ट्रिक बस नाशिक जिल्ह्यात सेवेत आहेत.
नवीन मार्गांमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. नाशिक–बोरिवली दरम्यानचा प्रवास पूर्वी ९ तासांचा असायचा, तो आता ७ तास ४५ मिनिटांवर आला आहे. घोडबंदर रोडवरील कोंडी टाळल्यामुळे आणखी वेळ वाचतो.
नाशिक–छत्रपती संभाजीनगर या १७९ किमीच्या मार्गात ११६ किमी प्रवास समृद्धी महामार्गावरून होत असून, पूर्वी ५ तास १५ मिनिटे लागणारा हा प्रवास आता फक्त ४ तासांत पूर्ण होतो. सरासरी ६०–९० मिनिटांची बचत प्रवाशांना होत आहे.
बसचे वेळापत्रक आणि भाडे कसे आहे?
नाशिक–छत्रपती संभाजीनगर मार्गावर सकाळी ६ आणि सायंकाळी ६ वाजता बस सुटते. पूर्ण तिकीट ५०९ रुपये, अर्धे तिकीट २५५ रुपये व महिलांसाठी २66 रुपये दर आहेत.
नाशिक–बोरिवलीसाठी ६ ते ५.३० या वेळेत ११ फेऱ्या उपलब्ध असून तेच दर लागू आहेत.
तर बोरिवली–नाशिक मार्गावर सकाळी ५ ते ५.३० या वेळेत ११ सेवा सुरु आहेत. समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या या इलेक्ट्रिक बससेवेमुळे प्रवाशांना सुरक्षित, वेगवान, स्वस्त आणि आधुनिक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.













