1 लाख 55 हजार रुपयांचा सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन फक्त 92 हजाराला ! कुठं सुरु आहे ऑफर ? पहा…

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना आता कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. खरे तर या स्मार्टफोनची किंमत एक लाख 55 हजार रुपये इतकी होती पण आता हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त 92 हजार रुपयात खरेदी करता येणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Samsung Galaxy Z Fold 4 5G : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी एक खास अपडेट आहे. सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

हा स्मार्टफोन ग्राहकांना आता कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. खरे तर या स्मार्टफोनची किंमत एक लाख 55 हजार रुपये इतकी होती पण आता हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त 92 हजार रुपयात खरेदी करता येणार आहे. Amazon या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग साइटवर सॅमसंगच्या या जबरदस्त स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर सुरू आहे.

यामुळे ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत. अमेझॉन वर या स्मार्टफोनच्या किमतीत मोठे कपात करण्यात आली आहे सोबतच या साइटवर ग्राहकांना बँक ऑफरचा देखील लाभ मिळतोय. यामुळे ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांना कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. दरम्यान आज आपण अमेझॉन वर सुरू असणाऱ्या याच ऑफर बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 5G स्मार्टफोनची किंमत आणि डिस्काउंट ऑफर !

Samsung Galaxy Z Fold 4 5G चा 12 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट ई-कॉमर्स साइट Amazon वर फक्त 94,990 रुपये किमतीसह ग्राहकांसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. खरे तर हा स्मार्टफोन ऑगस्ट 2022 मध्ये 1,54,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता.

मात्र आता अमेझॉनवर हा स्मार्टफोन 60 हजार रुपये कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच अमेझॉनवरून हा स्मार्टफोन खरेदी केला तर ग्राहकांना बँक ऑफरचा देखील लाभ मिळणार आहे. ग्राहकांनी हा स्मार्टफोन खरेदी करताना अमेझॉन पे किंवा मग आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर ग्राहकांना पाच टक्के कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे.

दरम्यान ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेतल्यास या स्मार्टफोनची प्रभावी किंमत 92 हजार 141 रुपये एवढी होणार आहे. म्हणजेच एक लाख 55 हजार रुपयांचा हा स्मार्टफोन ग्राहकांना आता अमेझॉनवर फक्त 92 हजार 141 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

कसे आहेत फीचर्स, स्पेसिफिकेशन अन कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 5G हा कंपनीचा एक जबरदस्त स्मार्टफोन आहे. हा कंपनीचा एक प्रीमियम स्मार्टफोन असून यामध्ये देण्यात आलेले स्पेसिफिकेशन हे फारच उत्कृष्ट आहेत. यामध्ये 7.6 इंच एलटीपीओ डायनॅमिक एमोलेड 2 एक्स इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे.

कंपनीने म्हटल्याप्रमाणे हा असा डिस्प्ले ज्याचे रिझोल्यूशन QXGA+ 2176×1812 पिक्सल, 21.6: 18 आस्पेक्ट रेट, रीफ्रेश रेट 1 Hz ते 120 हर्ट्ज आहे. यात आणखी 6.2 इंच एचडी+ डायनॅमिक एमोलेड 2 एक्स डिस्प्ले आहे, ज्यात रिझोल्यूशन 904×2316 पिक्सेल, 120 हर्ट्ज अ‍ॅडॉप्टिव्ह रीफ्रेश आणि 23.1: 9 आस्पेक्ट रेशो आहे.

यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 प्रोसेसर आहे. म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेले प्रोसेसर हे पावरफूल असून यामुळे हा स्मार्टफोन युजर फ्रेंडली झालाय. या स्मार्टफोनचा लूक तर जबरदस्त आहेच शिवाय त्याचा कॅमेरा सुद्धा जबरदस्त आहे.

याच्या मागील बाजूस f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 12 -मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 10 -मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. तसेच या स्मार्टफोनच्या पुढील भागात f/1.8 अपर्चरसह पहिला 4 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह दुसरा 10 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

म्हणून ज्या ग्राहकांना व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी, सेल्फी घेण्यासाठी तसेच बॅक कॅमेराने फोटो क्लिक करण्यासाठी उत्कृष्ट मोबाईल हवा असेल त्यांच्यासाठी हा एक परफेक्ट मोबाईल फोन असणार आहे. यात 4,400 एमएएचची ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे जी 25 डब्ल्यू चार्जरला समर्थन देते. म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये चांगली पावरफूल बॅटरी सुद्धा देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe