Samudrik Shastra : आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची शारीरिक जडणघडण ही इतरांपेक्षा वेगळी असते. प्रत्येक जण आपल्यापेक्षा भिन्न असतो. विशेष बाब म्हणजे व्यक्तीच्या शरीरावरून सुद्धा त्याचा स्वभाव कसा असू शकतो? याचा अंदाज बांधता येतो.
सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीचे हात-पाय, नाक पाहून सुद्धा त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असू शकते त्याचे भविष्य कसे असू शकते याबाबत माहिती देण्यात आली आहे. सामुद्रिक शास्त्रानुसार, जीवनात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटना व्यक्तीच्या हात-पायांची रचना, चिन्हे आणि रेषा यावरून जाणून घेता येतात.
असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीच्या बोटांची रचना देखील त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगू शकते. सामुद्रिक शास्त्रात पायाच्या बोटांवरून देखील व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि भविष्य ओळखले जाऊ शकते असा दावा केला जातो. अशा परिस्थितीत आज आपण पायाच्या बोटांवरून व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा आहे? त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
पायाच्या अंगठ्यापेक्षा दुसरे बोट लांब असेल तर : असे मानले जाते की, ज्या लोकांचा अंगठा जवळील बोट हे अंगठ्यापेक्षा लांब असते असे लोक स्वभावाने हट्टी असतात. त्यांना इतरांसमोर झुकणे आवडत नाही. ते प्रत्येकाला त्यांच्या दृष्टिकोनाशी सहमत होण्यास भाग पाडतात. यांचे व्यक्तिमत्व हे फारच युनिक आणि इतरांना आकर्षित करणारे असेच असते.
त्यांच्या जिद्दी स्वभावामुळे त्यांना मोठे यशही मिळते. असे लोक खूप दृढनिश्चयी असतात आणि त्यांना आव्हानांचा सामना कसा करायचा हे माहित असते. असे म्हणतात की असे लोक आपल्या चुका सहजासहजी मान्य करत नाहीत, पण हे लोक चुका देखील अधिक करत नाहीत. जर समजा चूक झाली तर चूक मान्यही करत नाहीत.
अंगठा शेजारील बोट अंगठ्यापेक्षा लहान असेल तर : सामुद्रिक शास्त्रानुसार, असे लोक नेहमी आनंदी असतात. यांना आनंदी राहायला विशेष आवडते. उद्याची चिंता करण्यापेक्षा आज जे आपल्याकडे आहे त्यामध्ये समाधान मानून आनंद व्यक्त करणारी ही मंडळी.
त्यांना आपले काम करायला आवडते अन यामुळे हे नेहमीच आपल्याला आनंदी पाहायला मिळतात. त्यांचे कोणी ऐकले नाही तर ते नाराजी व्यक्त करू लागतात. अनेक वेळा त्यांना वाटते की ते करत असलेले काम योग्य आहे आणि लोकांनी त्यांचे काम स्वीकारले पाहिजे.
अंगठ्याजवळील बोट अंगठ्या एवढेच असेल तर : जर अंगठ्या जवळील बोटाची लांबी ही अंगठ्याएवढीच असेल तर असे लोक आपलं आयुष्य आरामात जगतात. या लोकांचे आयुष्य अगदीच आरामात निघून जाते. या लोकांना आपल्या मुलांकडून आणि कुटुंबाकडून आनंद मिळतो.
अशा लोकांचा स्वभाव आनंददायी असतो आणि ते खूप मेहनतीही असतात. इतरांना मदत करण्यासाठी हे लोक नेहमीच तत्पर राहतात आणि हाच त्यांचा स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो.