संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोणाला मिळतो ? वाचा सविस्तर

Published on -

Sanjay Gandhi Niradhar Yojana : केंद्र आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

संजय गांधी निराधार योजना ही शासनाचे असेच एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली असून आज आपण या योजनेची माहिती पाहणार आहोत.

खरंतर या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यात सरकारकडून नुकतीच वाढ करण्यात आले आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडूनमहिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.

पण अलीकडेच फडणवीस सरकारने या योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना 1000 रुपये अधिक आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात आता संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र दिव्यांग  लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये प्रतिमा हीना एवढे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

यामुळे ही योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहिणी योजनेत गेल्या काही दिवसांपासून मोठा गोंधळ सुरू आहे. या योजनेसाठी आता केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे तसेच पडताळणी सुद्धा सुरू आहे.

यामुळे आता अनेक महिला या संजय गांधी निराधार योजनेत अर्ज करत आहेत. पण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो हा मोठा सवाल आहे आणि आज आपण याच बाबत माहिती पाहूया.

या लोकांना मिळतो लाभ

महाराष्ट्रातील 18 – 65 वर्ष वयोगटातील निराधार पुरुष व महिला

अनाथ मुले

अपंग व्यक्ती

कर्करोग टीव्ही अशा आजारांनी ग्रस्त लोक

विधवा महिला

घटस्फोटीत महिला

वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला

ट्रान्सजेंडर

35 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या अविवाहित महिला

सिकल सेल आजाराने ग्रस्त लोक

तुरुंगात असणाऱ्या लोकांच्या पत्न्या 

अर्ज कसा करावा?

दारिद्र्य रेषेतील लोक संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र ठरतात. https://sjsa.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक लोकांना ऑनलाईन अर्ज करता येतो.

ऑफलाईन करायचा असल्यास समाज कल्याण कार्यालयात जावे. तिथे गेल्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जमा करा. 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News