उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘या’ ड्रीम प्रोजेक्टला लागला ब्रेक ! कारण काय ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक लागला आहे. मुनावळे गावातील जल पर्यटन प्रकल्प स्थगित झाला आहे. सातारा जिल्ह्यातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्थगित करण्यात आला असल्याने हा शिंदे यांच्यासाठी एक मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Published on -

Satara News : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक लागला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील मुनावळे गावात जल पर्यटन प्रकल्प राबवला जाणार होता.

मात्र आता या जल पर्यटन प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आदेश प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

प्रकल्पाला संबंधित विभागांची आवश्यक परवानग्या न मिळाल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे सांगितले गेले आहे. मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाच्या कामाला गेल्या वर्षीच सुरुवात करण्यात आली होती.

हा प्रकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटींची सुरूवात केली होती, आणि त्यानंतर येथील पर्यटकांसाठी नवीन प्रकल्प प्रस्तावित केला जात होता.

या प्रकल्पाची निविदा काढण्यात आली होती, परंतु हे सर्व काम संबंधित विभागांच्या परवानग्यांशिवाय सुरू करण्यात आले होते. हीच बाब समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला.

या प्रकल्पाच्या विरोधात 2 एप्रिल रोजी त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता. या आंदोलनामुळे अखेर प्रशासनाला एक लेखी आदेश काढावा लागला, ज्यात स्पष्ट करण्यात आले की, संबंधित विभागांच्या परवानग्या घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येऊ शकत नाही.

मुनावळे परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागात कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी विविध सरकारी संस्थांची मंजुरी अनिवार्य आहे.

तथापि, एकनाथ शिंदे यांच्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी यापूर्वी कोणत्याही परवानग्या घेतल्या नसल्याचे उघड झाले असून प्रशासनाने या प्रकल्पाचे काम स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

हा प्रकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा असला तरी प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी अनिश्चिततेच्या वळणावर पोहोचली आहे.

यामुळे आता या प्रकल्पासंदर्भात पुढे काय निर्णय होतो? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी फडणवीस सरकारकडून काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe