Satbara Utara Mobile Application : गेल्या काही दशकात शासकीय कामांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठा वाढला आहे. शासकीय कागदपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांसाठी जमिनीचे सातबारे, आठ अ उतारे देखील ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत.
विशेष म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेले हे ऑनलाईन उतारे शासकीय कामांसाठी वैध आहेत. यामुळे सातबारा उतारा काढण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज शेतकऱ्यांना राहिली नाही.
शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभुमी या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर सातबारा उतारा, 8अ उतारा उपलब्ध होत आहे. या महाभूमी पोर्टलवर शेतकऱ्यांना पंधरा रुपयात सातबारा उतारा मिळत आहे.
हे पण वाचा :- सोयाबीन पेरणी करताय ? मग हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सुचवलेल्या ‘या’ वाणाची लागवड करा, उत्पादनात होणार मोठी वाढ, वाचा….
यासोबतच आता केंद्र शासनाच्या उमंग या एप्लीकेशनवर देखील शेतकऱ्यांना सातबारा उतारा डाऊनलोड करता येणार आहे. केवळ पंधरा रुपयांमध्ये या एप्लीकेशनवर सातबारा उतारा डाऊनलोड करता येणार असून याची प्रिंट आऊट घेण्याची देखील गरज राहणार नाही.
आता उमंग मोबाइल ॲपवर डिजिटल स्वरूपात उतारा उपलब्ध होणार असून, त्याची प्रिंट न काढताच अन्य व्यक्तीला अथवा कार्यालयांना तो पाठविता येणार असल्याचे जाणकार लोकांनी स्पष्ट केले आहे.
तसेच याच ॲपवरून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे टाकता येतील आणि ऍपवरूनच सातबारावरील डॉक्युमेंट आयडीवरून त्याची अचूकता पडताळणी करता येणे शक्य होणार असल्याचे सांगितले गेले आहे.
कुठे डाऊनलोड करणार एप्लीकेशन
केंद्र शासनाने विकसित केलेले उमंग हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध आहे. तसेच एप्पल स्टोअरवर देखील एप्लीकेशन उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल ते शेतकरी प्ले स्टोअर वर जाऊन उमंग हे नाव सर्च करून हे एप्लीकेशन डाउनलोड करू शकणार आहेत. https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.umang.negd.g2c या लिंक वर जाऊनही शेतकऱ्यांना हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करता येणार आहे.
शेतकऱ्यांच्या वेळेत होणार बचत
पुणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या उमंग अँपवर राज्यातील शेतकऱ्यांना सातबारा उतारा डाऊनलोड करता येणार आहे.
ॲपवर अकाऊंट तयार करून त्यात पैसे जमा केल्यानंतर ओटीपी येईल आणि या अकाऊंटमधून १५ रुपये वळते झाल्यावर उतारा डाउनलोड होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेत बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे.
हे पण वाचा :- कमी पाऊस पडला तरी सोयाबीनच्या ‘या’ वाणातून मिळणार विक्रमी उत्पादन, वाचा…