Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
Saving Account Rate

HDFC, ICICI की Yes बँक ? कोणत्या बँकेकडून सेविंग अकाउंटवर मिळते सर्वाधिक व्याज ? वाचा डिटेल्स

Wednesday, April 23, 2025, 1:21 PM by Tejas B Shelar

Saving Account Rate : रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये दोनदा रेपो रेट मध्ये कपात केली आहे. आरबीआयने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या पतधोरण बैठकीमध्ये रेपो रेट 25 बेसिस पॉईंटने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच आरबीआयकडून 25 बसेस पॉइंट ने पुन्हा एकदा रेपो रेट कमी करण्यात आले.

म्हणजेच गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआयकडून रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आले असून याचा परिणाम म्हणून आता रेपो रेट 6 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे आता देशातील प्रमुख बँकांच्या माध्यमातून आपल्या होम लोनसहित सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात कपात केली जात आहे.

Saving Account Rate
Saving Account Rate

त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे तर दुसरीकडे फिक्स डिपॉझिट वरील आणि सेविंग अकाउंट मध्ये जमा असणाऱ्या पैशांवरील व्याजदरात देखील बँकांकडून कपात केली जात आहे यामुळे काही ग्राहकांना आरबीआयच्या रेपो रेट कपातीचा फायदा होतोय तर काही ग्राहकांना याचा तोटा सुद्धा होणार आहे.

अशा या परिस्थितीत आज आपण देशातील एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि येस बँक या प्रमुख तीन बँकांच्या सेविंग अकाउंट वरील व्याजदराची तुलना करणार आहोत.

येस बँकेचे व्याजदर : मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयच्या निर्णयानंतर देशातील प्रमुख प्रायव्हेट बँकेपैकी एक असणाऱ्या येस बँकेने सुद्धा आपल्या व्याजदरात बदल केलेला आहे. या बँकेने बचत खात्यावरील व्याजदरातही बदल केले आहेत. ही बँक सध्या सेविंग अकाउंट मध्ये ठेवीच्या रकमेनुसार व्याज देत आहे. बँकेकडून प्राप्त माहितीनुसार, ही बँक 10 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 3 टक्के व्याज देत आहे.

10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 3.50 टक्के व्याज देत आहे. याशिवाय, जर तुम्ही बँकेत 25 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे पैसे जमा केलेत तर तुम्हाला 4 टक्के दराने व्याज दिले जात आहे. ही बँक सध्या 50 लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 5 टक्के व्याज देत आहे.

एचडीएफसी बँक : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. या बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरातही कपात केली आहे. 12 एप्रिल 2025 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत.

बँक 50 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवींवर वार्षिक 2.75 टक्के व्याजदर देत असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. याशिवाय, 50 लाख रुपये आणि त्याहून अधिक ठेवींवर वार्षिक 3.25 टक्के व्याजदर दिले जात असल्याची माहिती हाती आली आहे.

ICICI : आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही प्रायव्हेट बँक आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिट वर चांगले व्याज देत आहे. पण या बँकेने सेविंग अकाउंटच्या व्याजदरात कपात केली आहे.

जर तुमच्या खात्यात 50 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल, तर त्यावर 2.75 टक्के दराने व्याज मिळणार आहे, जे पूर्वी 3 टक्के व्याज होते. म्हणजेच 25 बेसिस पॉईंटने या व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

Categories स्पेशल Tags Bank Saving Account, Bank Saving Account Rate, banking news, Saving Account, Saving Account News, Saving Account Rate News, Saving Account Rates
पाणी पितांना पण काळजी घ्यायला हवी ! एका दिवसात किती पाणी प्यायला हवे ? तज्ञ काय सांगतात…
बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील तरी ग्राहकांना 10 हजार रुपये काढता येणार ! कोणत्या ग्राहकांना मिळणार लाभ ? वाचा सविस्तर
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress